राज ठाकरेंच्या पत्रावर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,”देवेंद्र फ़डणवीस…”

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजपमध्ये लढत होण्याची चिन्हं आहेत मात्र, ही पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे यांच्या पत्रावर श्रीकांत शिंदे यांनी देवेंद्र फ़डणवीस चर्चा करुन योग्य निर्णय घेतील असा विश्वास व्यक्त केला आहे. मागाठणे विधानसभा मतदारसंघातील दहिसर पूर्व येथे आमदार प्रकाश सुर्वे व विभागप्रमुख यांच्या शाखा क्रमांक ४ चा उद्घाटन सोहळा पार पडला. या उद्घाटन सोहळ्यास श्रीकांत शिंदे यांनी उपस्थिती लावली.
मागाठणे विधानसभा मतदारसंघातील दहिसर पूर्व येथे आमदार प्रकाश सुर्वे व विभागप्रमुख यांच्या शाखा क्रमांक ४ चा उदघाटन सोहळा आज मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. या उदघाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरीकांमध्ये प्रचंड उत्साह पहायला मिळाला. pic.twitter.com/SvrQ4RkStS
— Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) October 16, 2022
कार्यक्रमानंतर बोलताना ते म्हणाले की “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं आहे. ते आपले कार्यकर्ते, पदाधिकारी तसंच वरिष्ठ आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेतील”.
ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. मोठ्या प्रमाणात लोक पक्षासोबत जोडले जात आहेत. आम्ही जमिनीशी जोडलेलो असून, जमिनीवर उतरुन काम करतो असेही श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले.





