श्री सिद्धीविनायक क्रिटिकेअर हॉस्पिटल

डॉ. मिलिंद शांताराम थेऊरकर व डॉ. गणेश शशिकांत ताठे हे श्री सिद्धीविनायक हॉस्पिटलचा संपूर्ण मेडिसीन विभाग पाहतात. आपल्या पंचक्रोशीमधील गरजू व गरीब रुग्णांना या हॉस्पिटलनी अत्यंत कमी दरामध्ये व प्रामाणिकपणे वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पंचक्रोशीतील सर्वात पहिले अत्यावश्यक सेवा देणारे हे पहिले हॉस्पिटल आहे.
येथे उपचार घेणारे रुग्णांची काळजी अत्यंत खातीर जबाबाने केली जाते व येथील स्टाफ अत्यंत मनमिळावू व होतकरू आहे. कोविडच्या काळामध्ये किमान एक हजारहून अधिक रुग्ण बरे करून हॉस्पिटलनी या पंचक्रोशीमध्ये अत्यावश्यक सेवेमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या हॉस्पिटलमध्ये अत्यावश्यक विभाग हा महत्त्वपूर्ण विभाग डॉ. श्रीपाद कोरे (चइइड) ऊछइ, ऋउझड खऊउउच, हे डॉक्टर स्वतः बघत असून त्यांचा अनुभव खूप दांडगा आहे. मागील 12 वर्षांपासून ते पूना हॉस्पिटल येथे अत्यावश्यक सेवेमध्ये सातत्याने काम करीत आहेत.
डॉ. अर्जुन शिंदे हे या हॉस्पिटलचा बालरोग विभाग व नवजात शिशू विभाग सांभाळत असून, कमी काळात त्यांनीसुद्धा बालरोग क्षेत्रामध्ये चांगले नाव कमाविले आहे.




