हॅमिल्टन :– भारतात येत्या ऑक्टोबरमध्ये एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत पात्र होण्यात श्रीलंका संघाला अपयश आल्यामुळे जून महिन्यात होत असलेल्या पात्रता स्पर्धेत खेळून पात्रता मिळवण्याची नामुष्की श्रीलंकेवर ओढवली आहे.
थेट पात्र होण्यासाठी येथे सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेला विजय मिळवण्याची गरज होती. मात्र, त्यांचा पराभव झाल्याने आता त्यांचे विश्वकरंडक स्पर्धेत थेट पात्र होण्याचे स्वप्न भंग झाले आहे. तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका श्रीलंकेने 2-0 अशी गमावली. या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला होता.
मात्र अजूनही श्रीलंकेकडे वर्ल्डकप खेळण्याची संधी आहे. विश्वकरंडक स्पर्धेत एकूण 10 संघ खेळणार असून आतापर्यंत 7 संघ निश्चित झाले आहेत. आता उर्वरित तीन संघांसाठी येत्या जून महिन्यात पात्रता स्पर्धा होणार असून, त्यातून स्पर्धेची पात्रता मिळवण्याची श्रीलंकेकडे संधी आहे.
#IPL2023 : कोहलीच्या RCBला मोठा झटका, पहिल्या सात सामन्यांतून….
दरम्यान, 1996 साली या स्पर्धेचे विजेतेपद मिळवत जागतिक यश मिळवलेल्या श्रीलंका संघाची त्यानंतर मात्र कामगिरी सातत्याने खालावलेली आहे.