Multibagger Stock: कमालच झाली! 2.50 रुपयांचा शेअर पोहोचला 2100 रुपयांवर, गुंतवणुकदार झाले कोट्याधीश

Sri Adhikari Brothers Television Network Share Price: वर्ष 2024 शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी चढ-उताराचे राहिले. यावर्षात अनेक शेअर्सच्या किंमतीत प्रचंड मोठी वाढ पाहायला मिळाली, तर काही शेअर्सच्या किंमती स्थिरच राहिल्या. काही पेनी स्टॉक्सच्या किंमतीत देखील मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाली. यापैकीच एक श्री अधिकारी ब्रदर्स टेलिविजन नेटवर्क (Sri Adhikari Brothers Television Network) या कंपनीचे शेअर्स आहेत.
श्री अधिकारी ब्रदर्स टेलिविजन नेटवर्कच्या शेअर्सच्या किंमतीत मोठी वाढ
श्री अधिकारी ब्रदर्स टेलिविजन नेटवर्कच्या शेअर्सची किंमत 25 डिसेंबरला 1814 रुपये एवढी होती. हा स्टॉक 10 डिसेंबरला मागील 52 आठवड्यातील सर्वात उच्चांकी किंमतीवर पोहोचला होता. 10 डिसेंबरला शेअरची किंमत 2,197.70 रुपये होती. तर 52 आठवड्यातील सर्वात निच्चांकी पातळी 2.73 रुपये एवढी होती.
म्हणजेच या वर्षात शेअरच्या किंमतीत 52,876 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली. तर वर्षभरात 66,900 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले. गुंतवणुकदारांना दोन वर्षात 70 हजार टक्क्यांपेक्षा अधिक, 3 वर्षात 59,300 टक्के आणि 5 वर्षात 1,29,200 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा मिळाला आहे. बीएसईवर सध्या कंपनीचे मार्केट कॅप 4556.75 कोटी रुपये आहे.
1 लाखाचे झाले 8 कोटी रुपये
श्री अधिकारी ब्रदर्स टेलिविजन नेटवर्कच्या शेअर्सची 26 डिसेंबर 2023 ला किंमत 2.50 रुपये होती. म्हणजेच यावेळी 1 लाखात 40 हजार रुपयांचे शेअर्स खरेदी करता आले असते. 1 वर्षानंतर आता शेअरची किंमत जवळपास 1800 रुपये आहे. म्हणजेच, एक वर्षात 1 लाखांच्या गुंतवणुकीत तब्बल 8 कोटी रुपयांचा परतावा मिळाला असता.





