SRH vs RR : हैदराबादचा पहिल्याच सामन्यात राजस्थानवर दणदणीत विजय, इशान-ट्रॅव्हिस ठरले विजयाचे शिल्पकार

SRH vs RR Sunrisers Hyderabad beat Rajasthan Royals by 44 runs : सनरायझर्स हैदराबादने आयपीएल २०२५ च्या हंगामाची सुरुवात राजस्थान रॉयल्सचा ४४ धावांनी पराभव करून विजयाने केली. इशान किशन आणि ट्रॅव्हिस हेड यांच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादने २० षटकांत ६ बाद २८६ धावा केल्या, जी या स्पर्धेतील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. प्रत्युत्तरादाखल, संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांनी चांगली भागीदारी केली पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. राजस्थान संघ निर्धारित षटकांत सहा गडी बाद केवळ २४२ धावा करू शकला आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
सॅमसन-जुरेल झुंज ठरली अपयशी –
लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. कारण त्यांनी ५० धावांच्या आत तीन विकेट्स गमावल्या. सामन्यात प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या सॅमसनने जुरेलसोबत चौथ्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी करत संघाला अडचणीतून बाहेर काढले. जेव्हा सॅमसन आणि जुरेल फलंदाजी करत होते, तेव्हा असे वाटत होते की राजस्थान आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग करू शकेल, परंतु सॅमसन बाद होताच ही भागीदारी तुटली. सॅमसन पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर, जुरेलनेही आपली विकेट गमावली. शेवटी, शिमरॉन हेटमायर आणि शुभम दुबे यांनी थोडे प्रयत्न केले, परंतु संघाला लक्ष्य गाठता आले नाही.
So run it up, the Sun is up 🔥🧡#PlayWithFire | #SRHvRR | #TATAIPL2025 pic.twitter.com/C8xHw0wle8
— SunRisers Hyderabad (@SunRisers) March 23, 2025
राजस्थानकडून यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने ३५ चेंडूत पाच चौकार आणि सहा षटकारांसह सर्वाधिक ७० धावा केल्या. त्याच वेळी, सॅमसनने ३७ चेंडूत सात चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या. हेटमायरने २३ चेंडूत एका चौकार आणि चार षटकारांसह ४२ धावा केल्या, तर शुभमने ११ चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांसह ३४ धावा केल्या आणि नाबाद राहिला. राजस्थानकडून नितीश राणाने ११, कर्णधार रियान परागने ४, यशस्वी जैस्वालने १ आणि जोफ्रा आर्चरने १ धावा करून नाबाद राहिले. सनरायझर्स हैदराबादकडून सिमरनजीत सिंग आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद शमी आणि अॅडम झम्पाने प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
इशानने ४५ चेंडूत झळकावले शतक –
On your fuckin face MI and BCCI 🤌
The celebration says it all 🔥 #SRHvRRpic.twitter.com/ShL73SaPBO
— The Cinéprism (@TheCineprism) March 23, 2025
तत्पूर्वी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना हैदराबाद संघासाठी अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी चांगली सुरुवात करून दिली, परंतु अभिषेक बाद झाल्यानंतर हेडने आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. हेड बाद झाल्यानंतर, हैदराबादचा डाव मंदावेल असे वाटत होते, परंतु इशानने जोरदार फलंदाजी केली आणि ४५ चेंडूत शतक झळकावून आपली क्षमता सिद्ध केली. हा इशानचा सनरायझर्स हैदराबादकडून पदार्पण सामना होता. ४७ चेंडूत ११ चौकार आणि सहा षटकारांसह १०६ धावा काढल्यानंतर इशान नाबाद परतला.
हेही वाचा – SRH vs RR Travis Head : ‘राक्षस जाग चुका है…’, हेडने आर्चरची धुलाई करताच सोशल मीडियावर आला मीम्सचा महापूर
सनरायझर्सकडून हेडने ३१ चेंडूत नऊ चौकार आणि तीन षटकारांसह ६७ धावा केल्या, तर हेनरिक क्लासेनने १४ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकारासह ३४ धावा केल्या, नितीशकुमार रेड्डीने १५ चेंडूत ३० धावा केल्या, अभिषेकने ११ चेंडूत पाच चौकारांसह २४ धावा केल्या आणि अनिकेत वर्माने सात धावा केल्या. राजस्थानकडून सर्वात यशस्वी गोलंदाज तुषार देशपांडे होता, ज्याने तीन विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय महेश तिक्ष्नाने दोन आणि संदीप शर्माने एक विकेट्स घेतली.





