SRH vs DC : पॅट कमिन्सचा कहर! सलग तीन षटकातील पहिल्याच चेंडूवर केला खास पराक्रम पाहा VIDEO

Pat Cummins Shines during SRH vs DC match in IPL 2025 : आयपीएल २०२५ चा ५३ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पॅट कमिन्सने आपला निर्णय बरोबर असल्याचे सिद्ध करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. त्याने पॉवरप्लेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि दिल्लीच्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले. कमिन्सने सलग तीन षटकांत तीन विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे त्याने प्रत्येक षटकाच्या पहिल्या चेंडूवर एक विकेट्स घेतली.
पॅट कमिन्ससमोर दिल्लीच्या फलंदाजांनी पत्करली शरणागती –
खरंतर, दिल्ली कॅपिटल्सच्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर पॅट कमिन्सने करुण नायरला बाद केले. यानंतर तो तिसरे षटक टाकण्यासाठी आला. त्यानंतर त्याने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली आणि फाफ डु प्लेसिसला डगआउटवर पाठवले. त्यानंतर कमिन्स डीसीच्या डावातील पाचवे षटक टाकण्यासाठी आला. त्याने पहिल्याच चेंडूवर अभिषेक पोरेलला पायचीत केले आणि त्याला बाद केले. असे करून कमिन्सने सलग तीन षटकांत तीन विकेट्स घेतल्या.
Wickets ✅
Catch ✅
Captaincy ✅Pat Cummins is producing a perfect performance for #SRH in an important clash against #DC 🔥
Updates ▶ https://t.co/1MkIwk4VNE#TATAIPL | #SRHvDC | @SunRisers | @patcummins30 pic.twitter.com/SbACH0yVcJ
— IndianPremierLeague (@IPL) May 5, 2025
पॅट कमिन्सने केला खास पराक्रम –
आयपीएल सामन्याच्या पहिल्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा कमिन्स सनरायझर्सचा चौथा फलंदाज ठरला. त्याच्या आधी जगदीश सुचित, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांनी हे केले आहे. २०२२ मध्ये सुचिथने विराट कोहलीला, २०२३ मध्ये भुवनेश्वर कुमारने प्रभसिमरन सिंगला आणि या हंगामात सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर शमीने शेख रशीदला बाद केले. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खूपच खराब झाली आणि संघाने २९ धावांवर पाच विकेट गमावल्या.
हेही वाचा – Rishabh Pant Hope : ‘प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न अजूनही कायम…’, पराभवानंतरही ऋषभ पंतचे वक्तव्य
गेल्या काही सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी निराशाजनक –
Unbelievable. Unplayable! Captain #PatCummins is on BEAST MODE! 🫣💥
Watch the LIVE action ➡ https://t.co/bgzzyyahDZ#IPLRace2Playoffs 👉 #SRHvDC | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi & JioHotstar! pic.twitter.com/pqH6hk8tQU
— Star Sports (@StarSportsIndia) May 5, 2025
दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२५ ची सुरुवात धमाकेदार केली होती. त्यांनी सलग ४ पैकी ४ सामने जिंकले होते. पण, त्यानंतर, डीसीच्या फॉर्ममध्ये मोठी घसरण झाली. पुढील ६ सामन्यांपैकी संघाला फक्त २ सामने जिंकता आले. दिल्ली ज्या पद्धतीने खेळत आहे. त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचणे खूप कठीण वाटते. डीसीचे १० सामन्यांत ६ विजयांसह १२ गुण आहेत. १६ गुण मिळविण्यासाठी त्यांना येथून दोन सामने जिंकावे लागतील. तथापि, १६ गुणांसहही प्लेऑफचे तिकीट मिळेल याची हमी नाही. कारण हैदराबाद, राजस्थान आणि चेन्नई वगळता प्रत्येक संघ १६ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. अशा परिस्थितीत, हा विषय नेट रन रेटवर अडकू शकतो.





