यांची व्हॉट्स ऍपवरून हेरगिरी

नवी दिल्ली : भारतीय पत्रकार, वकील आणि मानवी क्क कार्यकर्त्यांसोबतच राजकीय नेत्यांच्या फोनमध्ये हेरगिरी केल्याचे उघड होत आहे. व्हॉटस् ऍपने एनएसओ गटाने बनवलेल्या पेगासस या स्पायवेअरच्या सहाय्यायने केलेल्या हेरगिरीच्या प्रकरणाचा भांडाफोड केला.
सरकार आणि व्हॉट्रस ऍप यांच्यात या प्रकरणाची माहिती दिल्याच्या अधिकृततेवरून तुतु मैमै सुरू झाली आहे. व्हॉट्सऍपच्या दाव्यानुसार जगभरातील एक हजार व400 लोकांच्या फोनमध्ये हेरगिरी केली गेली. त्यात देशातील 121 जणअंचा समावेश आहे.
यांची केली हेरगिरी
राजकारणी
प्रफुल्ल पटेल (माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादचिे नेते)
प्रियांका गांधी (कॉंग्रेस सरचिटणीस)
कार्यकर्ते आणि विचारवंत
विरा सीाथदार (कार्यकर्ते, अभिनेते)
बेला भाटीया ( छत्तिसगढमधील दलीत हक्क कार्यकर्त्या)
डेगरीप्रसाद चौहान (कार्यकर्ता)
आनंद तेलतुंबडे (विचारवंत)
आशिष गुप्ता (कार्यकर्ता)
विवेक सुंदर (कार्यकर्ता)
अजमलखान (कार्यकर्ता)
सरोज गिरी (दिल्ली विद्यापीटाच्या प्राध्यापक)
सीमा आझाद (कार्यकर्त्या)
रुपाली जाधव (कार्यकर्त्या)
पी पवना (भिमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी वरवरा राव यांची कन्या)
वकील
निहाल सिंह राठोड (भिमा कोरेगाव प्रकरणातील वकील)
जगदिश मेश्राम (गडचिरोलीतील वकील)
अंकित ग्रेवाल (भिमा कोरेगाव प्रकरणातील वकील)
अरूणांक (कायद्याचे पदवीधर)
रविंद्रनाथ भल्ला (वकील)
बाला रविंद्रनाथ (हैदराबादस्थित वकील)
मनदीपसिंग (चंदिगढ येथील वकील)
पत्रकार
शुभ्रांशू चौधरी (बीबीसीचे माजी पत्रकार)
सिध्दांत सिबल ( विऍनचे पत्रकार)
संतोष भारतॅय (माजी खासदार आणि पत्रकार)
राजीव शर्मा (स्वतंत्र पत्रकार)





