Spurious liquor case : …त्यांना मानधन देण्यास नगरसेवकांचा विरोध
Spurious liquor case : विषारी दारु प्रकरण - मृतांच्या नातेवाइकांना पैसे देण्याचा होता प्रस्ताव

Spurious liquor case : – फुगेवाडीमध्ये विषारी दारु पिल्याने १७ जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाइकांना नगरसेवकांनी त्यांचे एक महिन्याचे मानधन द्यावे अशी सूचना महापौर रवि लांडगे यांनी सभागृहात मांडली. त्या भागातील नगरसेवकांनी त्याचे स्वागत केले. तर बाकी नगरसेवकांनी या गोष्टीला विरोध केला.
काही दिवसांपूर्वी शहरातील फुगेवाडी भागात विषारी दारु प्यायल्याने १७ जणांना आपला प्राण गमवावा लागला. या घटनेमुळे शहरातील अनधिकृत दारुगुत्यांचा प्रश्न एरणीवर आला. तर त्यावर कारवाई करण्यात पोलिस प्रशासनाला आलेले अपयश देखील समोर आले. घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी महापौर रवि लांडगे यांनी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांसह मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली.
तर महापालिकेच्या वतीने नातेवाईकांना १ लाख रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महापौर रवि लांडगे यांनी मृतांच्या नातेवाईकांना नगरसेवकांचे एक महिन्यांचे मानधन देण्याची सूचना केली. त्याचे त्या प्रभागातील नगरसेवक राजू बनसोडे यांनी स्वागत केले. तर बाकीच्या नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला.
नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर म्हणाल्या, असा पद्धतीने चुकीचा पायंडा पाडू नका. चांगल्या कामासाठी एक महिन्याचे नाही तर वर्षभराचे मानधन देऊ. मात्र, ज्यांचा दारु पिऊन मृत्यू झाला आहे, त्यांना पैसे द्यायचे पटत नाही. यामुळे आपण समाजामध्ये काही संदेश देत आहोत याचा विचार करा.
दारू पिऊन मृत्यू झाल्यानंतर महापालिका पैसे देते, नगरसेवक त्यांचे मानधन देतात म्हणजेच आपण त्या गोष्टीला प्रोत्साहन देत आहोत. अशा चुकीच्या गोष्टीसाठी आम्ही आमचे मानधन देणार नाही. हीच बाब सर्वसाधारण सभा झाल्यानंतर देखील अनेक नगरसेवकांनी बोलून दाखवली.
हेही वाचा:





