एसपीज् बिर्याणी: सर्वोत्तमतेचा ध्यास घेतलेली 30 वर्षांची दमदार कहाणी…

SP’s Biryani – 1994 साली स्थापन झालेले एसपीज् बिर्याणी हाऊस तसं पाहता संपूर्णपणे बिर्याणीला वाहून घेतलेले हे रेस्टाॅरंट सुरु झाले एका सर्वोत्तमतेचा ध्यास घेतलेल्या ध्येयवेड्या माणसाच्या कल्पनेतून… 10 मे 2024 हा एसपीज् चा यंदाचा तिसावा वर्धापनदिन. हा वर्धापनदिन सोहळा सुप्रिसद्ध सिनेतारका अमृता खानविलकर, सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत, दिलीप जाधव, जवाहर चोरगे, चंद्रलेखा चोरगे, हर्षवर्धन चोरगे, ऋतुजा साठे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
दरवर्षी बिर्याणीत काही नवीन देऊ पाहणाऱ्या एसपीजने यंदा खास चोखंदळ खवैयांसाठी सादर केली आहे मलमल मटण दम बिर्याणी, मलमल मटण पुलाव आणि लजीज खिमा.. सर्वोत्तम जिन्नस वापरून तयार करण्यात आलेली ही बिर्याणी अत्यंत प्रीमियम क्वाॅलिटी असून बिर्याणीप्रेमींना 100 टक्के समाधान देणारी आहे. तसेच कमी तिखट असल्याने अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण या बिर्याणीचा स्वादानंद घेऊ शकतील. पण या नवीन रेसिपींचा स्वाद घेण्यासाठी एक दिवस आधी बुकिंग करावे तसेच बिर्याणी 1 किलो ते 5 किलो या लिमिटेड एडिशनमध्येच असतील.
तीस वर्षात अगदी तीसपेक्षा अधिक बिर्याणींची विविधता येथे आढळते. जगभराच्या बिर्याणी ते ही एकाच ठिकाणी ही अभिनव कल्पना त्यांनी प्रत्यक्षात एसपीज् मध्ये उतरवली. जवळपास तीन दशकांचा हा प्रवास थक्क करणारा नव्हता, पण कसोटी पाहणारा मात्र नक्कीच होता. पण याच कसोटीच्या काळातही सचोटीने प्रयत्न करणारे जवाहर चोरगे आणि त्यांना खंबीरतेने साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी चंद्रलेखा चोरगे यांनी हे यशस्वीतेने शिखर गाठले आहे. आता हाच वारसा हाॅटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेले त्यांचे पुत्र हर्षवर्धन चोरगे अधिक कल्पकतेने आणि सक्षमतेने पुढे नेत आहेत. बिर्याणीसाठी निरखून घेतलेले अस्सल जिन्नस आणि जगभराच्या बिर्याणींची शैली याचा सुरेख संगम एसपीज् ने साधला आहे. शिवाय या बिर्याणींना थोडा खास पुणेरी टच दिला म्हणूनच आज या बिर्याणी सर्वांच्या मनात ठाण मांडून बसल्या आहेत.
राणी मटण दम बिर्याणी, महाराजा मटण दम बिर्याणी, बलुची, पर्शियन, कराची, लखनवी, मराठा मटण/चिकन दम बिर्याणी अशी एक से बढकर एक बिर्याणींची फौज तुमच्या दिमतीस असते. पंचविसाव्या पर्धानप दिनानिमित्त ब्रॅंड अॅम्बेसडर आमिर खान यांच्या हस्ते त्यांच्याच नावाची खास अमिर खान बिर्याणी लाॅंच केली. आजतागायत पुणेकर खवैयांनी त्या बिर्याणीस भरभरून प्रतिसाद दिला आहे. आपल्या अस्सल चवीने आणि जगभराच्या बिर्याणींनी स्वत:चे वेगळेपण जपणाऱ्या आणि विविध ट्रेंड सेट करणाऱ्या एसपीजने बिर्याणी खवैयांसाठी आणखी एक विशेष ट्रेंड सेट केला तो म्हणजे बिर्याणी फेस्टिव्हल. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त बिर्याणींचा फेस्टिव्हल साजरा करणारे एसपीज् पहिले आणि एकमेव असेल. अत्तमोत्तम बिर्याणी, उत्कृष्ट सर्व्हिस आणि व्हॅले पार्कींगची सोयही उपलब्ध असल्याने प्रत्येकाने इथे जावे व लज्जतदार बिर्याणींचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन जोरगे यांनी केले आहे.


