पुणे : एसपी’ज् चा आगळावेगळा बिर्याणी फेस्टिव्हल सुरू

पुणे : एसपी’ज् बिर्याणी अवघ्या बिर्याणीप्रेमींच्या जिभेवरील आणि मनातील नाव! यंदाचे बिर्याणी फेस्टिव्हलचे हे बारावे वर्ष आहे. हा बिर्याणी फेस्टिव्हल आता सुरू झाला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. संदीप सिंग गिल (आयपीएस), मा. जालिंदर सुपेकर (डीआय्जी-महाराष्ट्र पोलीस, कारागृह विभाग), डॉ. संदीप साठे (जॉइंट कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स, पुणे) आणि मा. जयंत महाबोले उपस्थित होते.
जवळपास तीस वर्षे खवैयांना एक से बढकर एक बिर्याणीचा आस्वाद देताना एसपीज्ने दरवेळी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नातून बिर्याणी फेस्टिव्हलची भन्नाट कल्पना सुचली. एसपी’ज् बिर्याणीचे सर्वेसर्वा जवाहर चोरगे आणि हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेले त्यांचे पुत्र हर्षवर्धन यांच्या कल्पनेतून बिर्याणी फेस्टिव्हलची कल्पना सत्यात उतरवली.
अशाप्रकारचा संपूर्णपणे बिर्याणींचा हा आगळावेगळा फेस्टिव्हल बहुधा आणखी कुठे पहावयास मिळणे कठीणच! यामुळेच तर अगदी सर्वसामान्यांपासून राजकारण, क्रीडा, कला, समाजकार्य विविध क्षेत्रातील मान्यवर इथे बिर्याणींचा आस्वाद घेण्यास येतात. मग ते संगीत क्षेत्रातले दिग्गज संगीतकार अजय अतुल असो वा बॉलिवुडचा मि. परफेस्शनिस्ट आमीर खान सर्वचजण इथल्या बिर्याणींचे डाय हार्ट फॅन आहेत.
अगदी पर्शियनपासून काश्मिरीपर्यंत आणि इराणीपासून जाफराणीपर्यंत मटण व चिकन बिर्याणी इतकी बिर्याणींची वाईड रेंज इथे तुमच्या जिभेचे स्वादलाड पुरवतील. यासोबतच रसरशीत राजस्थानी लाल मटण, बढियाँ कराची मटण मसाला, फक्कड जत्रा मटण हंडी, चटकदार मटण खर्डा सगळाच बेत एकदम झक्कास! या नॉनव्हेजसोबतच व्हेज खवैयांचीही इथं उत्तम खातिरदारी आहे. व्हेज पुलाव, लाजवाब शाही व्हेज बिर्याणी, पनीर मसाला हाही बेत तितकाच स्वादपूर्ति करणारा आहे.
फक्त भारतातीलच नव्हे तर जगभरच्या बिर्याणींचा आस्वाद इथं एकाच ठिकाणी घेता येतो. दरवर्षी या फेस्टिव्हलला उदंड प्रतिसाद मिळतो. प्रत्येकवेळी काहीतरी नवीन देण्याच्या एसपीज्च्या परंपरेनुसार यावेळी त्यांनी मलमल मटण दम बिर्याणी, मलमल मटण पुलाव आणि लजीज खिमा या अत्यंत चवीष्ट डिश खवैयांसाठी तयार केल्या आहेत. चोखंदळ खवैयांचा त्यालाही भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
तेव्हा तुम्हीही या बिर्याणी फेस्टिव्हलला भेट द्या.. नि परतताना इथल्या अप्रतिम बिर्याणींची चव जिभेवर व मनात साठवून न्या!
बिर्याणी फेस्टिव्हलच्या उद्घाटन समारंभात दीप प्रज्वलन करताना (डावीकडून)- मा. जयंत महाबोले, मा. सचिन पाटील (क्राईम ब्रँच) डॉ. संदीप साठे (आयआरएस जॉईंट कमिशनर, इन्कम टॅक्स, पुणे), मा. जालिंदर सुपेकर (डीआयजी-महाराष्ट्र पोलीस, कारागृह विभाग), संदीप सिंग गिल (आयपीएस) हर्षवर्धन चोरगे, जवाहर चोरगे आणि सौ क्रतुजा साठे.


