पुणे जिल्हा | साथीच्या रोगांना आवरण्यासाठी मंचरमध्ये औषध फवारणी

मंचर, (प्रतिनिधी) – “सध्या पावसाळ्याचे वातावरण असल्याने डासांच्या वाढीस योग्य हवामान उपलब्ध होत आहे. शहरात Increase in mosquito population होऊ नये, तसेच डेग्यू व अन्य साथीचे आजार पसरू नयेत, म्हणून मंचर नगरपंचायत प्रशासन ‘अॅक्शन मोडवर’ आले आहे.
शहरात डास प्रतिबंधक औषध फवारणीचे कामकाज सर्वत्र सुरू आहे.” अशी माहिती मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली.
मंचर शहरात भरवस्तीत अनेक भंगार व्यावसायिकांची दुकाने आहेत. शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका खासगी हॉस्पिटलच्या उत्तर दिशेला भंगार खरेदी-विक्री दुकानात १०० हून अधिक जुने टायर अनेक महिने पडून आहेत.
अनेक टायरमध्ये अधून मधून पडणाऱ्या पावसामुळे पाणी साचले आहे. सध्या ढगाळ वातावरणामुळे विविध विषाणूंच्या वाढीसाठी हवामान अनुकूल आहे.
डासांचा उपद्रव व साथीचे आजार टाळण्यासाठी मंचर नगरपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन टायरची विल्हेवाट लावावी.” अशी मागणी मंचर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य लक्ष्मण थोरात भक्ते यांनी केली आहे. प्रत्येक कुटुंबानी आपले घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा.
उघड्यावर अन्न व कचरा टाकू नये. त्यासाठी कचरापेटीचा वापर करावा. डास निर्मुलनासाठी फवारणीची कामे वेळोवेळी राबविली जातात.शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता. नगरपंचायतीने शहरातील १७ ही वार्डात डास नियंत्रण औषध फवारणीचे कामकाज नियमितपणे सुरू आहे.
आरोग्याबाबत नागरिकांकडून येणाऱ्या सूचनांची दखल नगरपंचायतीकडून तातडीने घेऊन उपाययोजना हाती घेतल्या जातात, असे मंचर नगरपंचायतीच्या आरोग्य विभाग प्रमुख राजश्री मोरे यांनी सांगितले.
जाधव म्हणाले “मंचर शहरातील बचत गटातील दहा महिला मंचर शहरात डेंग्यू नियंत्रणासाठी तीन आठवडे काम करत होत्या.
त्यामध्ये प्रामुख्याने डेंग्युबद्दल जनजागृती, साचलेल्या पाण्यात औषध टाकणे किंवा काढून देणे व इतर अत्यावश्यक उपाय योजना करण्यात आल्या असून हा उपक्रम पुढेही राबबिला जाईल.”
कोट: “मंचर शहराची लोकसंख्या ४५ हजाराच्या पुढे गेली आहे. नऊ हजार ५०० कुटुंब असून जवळपास एक हजार ५०० व्यावसायिकांची दुकाने आहेत. दररोज सरासरी साडेसात टन कचरा गोळा केला जातो.
शास्त्रोक्त पद्धतीने त्यावर प्रक्रिया केली जाते.जी कुटुंब व व्यावसायिक घंटागाडीत कचरा देणार नाहीत.त्यांनी इतरत्र कचरा टाकला आहे.
असे गृहीत धरून नियमांनुसार संबंधितांच्या विरोधात कारवाई केली जाईल.मंचर शहर व परिसर स्वच्छ ठेवण्याची जबादारी सर्व कुटुंबांनी व व्यावसायिकांनी पार पाडावी.” -गोविंद जाधव, मुख्याधिकारी नगरपंचायत मंचर.
“सर्व भंगार व्यावसायिकांना दुकान व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. टायर ताबडतोब पुढील प्रक्रियेसाठी (रीमोड) पाठवावेत. तसेच टायर किंवा कचरा जाळल्यास शासनाच्या नियमानुसार कारवाई केली जाईल.” -राजश्री मोरे, आरोग्य विभाग प्रमुख, मंचर नगरपंचायत.


