लक्षवेधी : अमेरिकेचे आखाती तळ!
आखातात अमेरिकेची अनेक लष्करी तळ (US Military Base) आहेत. मात्र इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांनी या तळांची असुरक्षितता उघड केली. या तळांना ‘पांढरा हत्ती’ असे म्हटले जात असले तरी ते पूर्णपणे निरुपयोगी आहेत का?

– हेमंत महाजन
US Military Base : आखातात अमेरिकेची अनेक लष्करी तळ (US Military Base) आहेत. मात्र इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांनी या तळांची असुरक्षितता उघड केली. या तळांना ‘पांढरा हत्ती’ असे म्हटले जात असले तरी ते पूर्णपणे निरुपयोगी आहेत का?
अमेरिका-इस्रायल विरूद्ध इराण संघर्षाने आधुनिक युद्धशास्त्रातील (US Military Base) अनेक गृहितके मोडून काढली. अनेक दशकांपासून आखाती प्रदेशात उभारलेल्या अमेरिकेच्या प्रचंड लष्करी तळांना जगातील सर्वात सुरक्षित आणि अभेद्य संरक्षण व्यवस्था असल्याचे मानले जात होते.
कतारमधील अल उदैद, बहारीनमधील पाचवा नौदल ताफा, कुवेत, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया आणि जॉर्डनमधील तळांवर अब्जावधी डॉलर खर्च करण्यात आले होते. मात्र इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांनी या तळांची (US Military Base) असुरक्षितता उघड केली. या संघर्षातून भारताने अत्यंत महत्त्वाचे धोरणात्मक धडे घेण्याची गरज आहे. अमेरिकेने आखातात इतके तळ का उभारले? अमेरिकेच्या आखातातील तळांचे प्रमुख उद्दिष्ट चार प्रकारचे होते.
ऊर्जा सुरक्षेचे संरक्षण
इराणला रोखणे
दहशतवादविरोधी कारवाया
शक्तिप्रदर्शन
हे तळ ‘सिटिंग डक्स’ का ठरले?
स्थिर लक्ष्यांची समस्याः कोणताही हवाई तळ, नौदल तळ किंवा लॉजिस्टिक केंद्र हे स्थिर लक्ष्य असते. त्याचे अचूक स्थान शत्रूला माहीत असते.
क्षेपणास्त्रांचा प्रचंड माराः इराणकडे हजारो बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे आहेत. अगदी सर्वोत्तम संरक्षण प्रणालीसुद्धा एकाच वेळी शेकडो क्षेपणास्त्रे रोखू शकत नाहीत.
ड्रोन स्वॉर्म हल्लेः कमी किमतीचे शेकडो ड्रोन पाठवून संरक्षण प्रणाली गोंधळात टाकली जाऊ शकते.
आर्थिक विषमताः एक स्वस्त ड्रोन काही हजार डॉलरमध्ये तयार होतो. त्याला पाडण्यासाठी वापरले जाणारे Patriot, THAAD किंवा SM-3 इंटरसेप्टर लाखो डॉलरचे असतात.
संतृप्ती (Saturation) : जगातील कोणतीही हवाई संरक्षण प्रणाली 100 टक्के यशस्वी नसते.
जर 200 क्षेपणास्त्रे डागली गेली आणि 90 टक्के रोखली गेली तरी 20 लक्ष्यांवर परिणाम होतो.
अमेरिकन हवाई संरक्षण व्यवस्था अपयशी का ठरली?
अमेरिकेने अनेक क्षेपणास्त्रे पाडली.परंतु खालील कारणांमुळे संपूर्ण संरक्षण शक्य झाले नाही.
हल्ल्यांची संख्याः इराणने मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरले.
बहुदिशात्मक हल्लेः वेगवेगळ्या दिशांनी आणि उंचीवरून हल्ले करण्यात आले.
कमी उंचीवरील क्रूझ मिसाइलः रडारपासून बचाव करून कमी उंचीवर उडणारी क्षेपणास्त्रे शोधणे कठीण असते.
इलेक्ट्रॉनिक युद्ध : GPS जॅमिंग, सायबर हल्ले आणि इलेक्ट्रॉनिक फसवणूक यामुळे संरक्षण व्यवस्थेवर ताण वाढतो.
या तळांचा उपयोग काय झाला?
काही तज्ज्ञ या तळांना ‘पांढरा हत्ती’ म्हणत असले तरी ते पूर्णपणे निरुपयोगी नाहीत.
हवाई मोहिमांचे केंद्रः इराक, सीरिया आणि अफगाणिस्तानमधील हजारो हवाई मोहिमा याच तळांवरून पार पडल्या.
लॉजिस्टिक हबः इंधन, दारूगोळा, सुटे भाग आणि सैन्याची वाहतूक यासाठी हे तळ अत्यंत महत्त्वाचे आहेत.
गुप्तचर आणि देखरेखः AWACS, उपग्रह नियंत्रण, ड्रोन ऑपरेशन आणि इलेक्ट्रॉनिक गुप्तचर कारवाया याच तळांवरून होतात.
मित्रदेशांना आश्वासनः या तळांमुळे आखाती देशांना अमेरिकेच्या सुरक्षेची हमी मिळते.
इराणविरुद्ध या तळांनी कोणती आक्रमक भूमिका बजावली?
हवाई हल्लेः इराणच्या लष्करी आणि अणुस्थळांवर हल्ले करण्यासाठी अमेरिकन विमाने या तळांवरून उड्डाण करत होती.
ISR ऑपरेशन्सः Intelligence, Surveillance and Reconnaissance मोहिमा चालवण्यात आल्या.
क्षेपणास्त्र संरक्षणः इराणी हल्ले रोखण्यासाठी THAAD आणि Patriot प्रणाली तैनात करण्यात आल्या.
नौदल नियंत्रणः बहारीनमधील पाचव्या ताफ्याद्वारे पर्शियन आखातातील समुद्री मार्गांवर नियंत्रण ठेवण्यात आले.
चीनच्या भारतीय महासागरातील तळांशी तुलना
चीनने अमेरिकेसारखे मोठे तळ उभारण्याऐवजी लॉजिस्टिक सपोर्ट नेटवर्क उभारण्याचा मार्ग स्वीकारला आहे.
जिबूतीः चीनचा पहिला अधिकृत परदेशी लष्करी तळ. तो बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीवर नजर ठेवतो.
ग्वादरः होर्मुझ सामुद्रधुनीच्या जवळ स्थित. भविष्यातील चिनी नौदलासाठी महत्त्वाचा आधारबिंदू ठरू शकतो.
हंबनटोटाः श्रीलंकेतील हे बंदर प्रकल्प अधिकृतपणे व्यापारी असले तरी त्याचा दुहेरी वापर शक्य आहे.
म्यानमारः सिटवे, क्यौकफ्यू आणि बंगालच्या उपसागरातील सुविधांमुळे चीनला मलक्का सामुद्रधुनीवरील अवलंबित्व कमी करता येते.
मालदीवः सध्या कोणताही अधिकृत चिनी लष्करी तळ नाही. मात्र वाढती आर्थिक आणि पायाभूत गुंतवणूक भविष्यातील प्रवेशद्वार बनू शकते.
चीनच्या तळांतील कमकुवत दुवे
अनेक विश्लेषक चीनच्या स्ट्रिंग ऑफ पर्ल्सला अभेद्य समजतात. प्रत्यक्षात युद्धकाळात हे तळ चीनसाठीही मोठी समस्या बनू शकतात.
मुख्य भूमीपासून अंतरः
पुरवठा रेषांवरील अवलंबित्व.भारतीय नौदल समुद्री मार्गांवर दबाव आणू शकते.
स्थानिक राजकारण.
अचूक भारतीय क्षेपणास्त्रेः ब्रह्मोस, निर्भय, लाँग रेंज प्रिसिजन वेपन्स आणि पाणबुड्यांमधून होणारे हल्ले या तळांना धोक्यात आणू शकतात.
युद्धकाळात हे तळ चीनसाठी स्ट्रॅटेजिक अॅसेटपेक्षा स्ट्रॅटेजिक लायबिलिटी ठरू शकतात.
भारतासाठी महत्त्वाचे धडे
मोठ्या तळांवर अवलंबित्व टाळा.
डिस्पर्स्ड ऑपरेशन्स.
भूमिगत सुविधा.
बहुस्तरीय हवाई संरक्षण एकत्रित करावे
हार्डनिंगः विमानतळ, रडार आणि कमांड पोस्ट मजबूत संरक्षित आश्रयस्थानांमध्ये ठेवावेत.
गतिशीलताः मोबाइल क्षेपणास्त्र लाँचर आणि मोबाइल रडार यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा.






