Deaflympics 2022 : भारताची दमदार कामगिरी सुरुच, टेनिस पुरुष दुहेरी स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई
Updated On:

नवी दिल्ली – ब्राझीलच्या कॅसियस दो सूल या शहरात सुरु असलेल्या 24 व्या मूकबधीर ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आणखी एका रौप्यपदकाची कमाई केली आहे. भारताच्या धनंजय दुबे आणि पृथ्वी शेखर या जोडीने टेनिस पुरुष दुहेरी स्पर्धेत ही कामगिरी केली. दरम्यान, गोल्फर दिक्षा डागरने गुरुवारी सुवर्णपदक जिंकले होते.
अंतिम सामन्यात फ्रान्सच्या मिकेल लॉरेन्ट आणि विनसेंट नोवेली यांनी भारताच्या धनंजय-पृथ्वी जोडीला मात दिल्याने भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात फ्रान्सने 6-7 आणि 2-6 च्या फरकाने भारतावर विजय मिळविला.
त्याआधी उपांत्य फेरीत भारतीय जोडीने अर्जेंटिनाच्या मेटियो गॉबी आणि निकोलस लॅहीटे यांना 6-4 आणि 6-0च्या फरकाने मात दिली होती.





