विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग; दिल्लीत आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक

Maharashtra Politics | राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वर्तुळात घडामोडीना वेग आला आहे. यातच आता विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस नेते दिल्लीला रवाना झाले आहेत.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यातील नेत्यांची दिल्लीत बैठक बोलवली आहे. सोमवारी सकाळी दहा वाजता होणाऱ्या या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाईल. राज्यातील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्या दृष्टीने आज चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यातील सहा प्रमुख नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. Maharashtra Politics |
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड हे नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. राहुल गांधी यांनी स्वतः फोन करून महाराष्ट्रातील काही नेत्यांना बोलून घेतल्याची माहिती आहे. Maharashtra Politics |





