Uddhav Thackeray : “आता देशाला मिळून ‘ऑपरेशन कमळ’ करावं लागेल!” उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदे गटावर प्रहार
Uddhav Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर अत्यंत टोकदार शब्दांत हल्लाबोल केला.

Uddhav Thackeray : आज गद्दारी झाली त्यावर मी मतदारांची माफी मागतो, मोदी लाट असताना तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला होता. 9 खासदार डोलाने निवडून आले, का फोडताय? काय मिळणार फोडून… इतके सत्ता पिपासू झालात असा सवाल करत देशाला आणि आपल्या सगळ्याला मिळून ऑपरेशन कमळ करावे लागेल, असा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. (Uddhav Thackeray)
उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेसेनेसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. याशिवाय पक्ष सोडणाऱ्या खासदारांना देखील त्यांनी लक्ष्य केले. ठाकरे कुटुंबावर आरोप करणाऱ्यांना देखील प्रत्युत्तर दिले. (Uddhav Thackeray)
उद्धव ठाकरे म्हणाले, भेसळ युक्त रक्त भगवा हातात घेऊ शकत नाही. लोकशाहीवरचा विश्वास उडून चालला आहे. आपण म्हणतो मशाल समोर बटन दाबा, मतं आम्हाला मिळेल. पवारसाहेब म्हणतात तुतारीचं बटणं दाबा, मतं आम्हाला मिळतील. पण भाजपवाले म्हणतात कोणाचंही बटणं दाबा माणूस आमच्याकडे येणार, असा टोला त्यांनी मारला. (Uddhav Thackeray)
आता देशाला आणि आपल्या सगळ्यांना मिळून ऑपरेशन कमळ राबवावे लागेल. तरुणांना झुरळ म्हणतात या देशाचा भवितव्य काय? सध्या लोकशाहीला धोका निर्माण झालेला आहे. जे.पी. नड्डा बोलले होते, वन नेशन इलेक्शन आता यांची वाटचाल वन नेशन नो इलेक्शनच्या दिशेने सुरु आहे. तुम्ही या वाटेने जात असाल तर दीर्घाकाळ सत्ता मिळणार नाही. (Uddhav Thackeray)
याच्यापुढे शिवसेना निवडणूक लढवणार नाही माझ्यासोबत किती जण राहतील? मर मर आपण करायची माणसं निवडून आपण आणायची नंतर खोके देऊन घेऊन हे जाणार, निवडणुकी आधी लाडकी बहीण योजना आणली नंतर 80 लाख बहिणींना बाहेर केले आहे. मेहनत तुम्ही केली या खासदारांना तुम्ही निवडून आणले, आता जाब विचारायचा अधिकार सुद्धा तुमचा आहे… मी आदेश काय देऊ, असे उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray)






