पुणे | रेल्वेची विशेष टूर.. चला पंढरपूर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आषाढी वारीला राज्यासह देशाच्या कानोपऱ्यातून भाविक श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होतात. त्यामुळे रेल्वेला मोठी गर्दी असते. रेल्वे प्रवासातही विठु नामाचा गजर करत, अभंग म्हणत हे भाविक पंढरपूरला येतात. त्यांच्यासाठी मध्य रेल्वेकडून येत्या दि. १४ ते २० जुलै दरम्यान विशेष ६४ गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नागपूर- मिरज विशेष
ट्रेन क्रमांक ०१२०५ आणि ०१२०५ : दि. १४ आणि १५ जुलै रोजी नागपूरहून सकाळी ८.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता मिरजला पोहचेल.
ट्रेन क्रमांक ०१२०६ आणि ०१२०८ : दि. १८ आणि दि. १९ जुलै रोजी दुपारी १२.५५ मिरजहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.५५ वाजता नागपूरला पोहोचेल.
नवीन अमरावती-पंढरपूर
ट्रेन क्रमांक ०१११९ : अमरावतीहून येथून दि. १३ आणि १६ जुलै रोजी दुपारी २.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.१० वाजता पंढरपूरला पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ०११२० : पंढरपूरहून दि. १४ आणि १७ जुलै रोजी रात्री ७.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४० वाजता अमरावतीला पोहोचेल.
खामगाव-पंढरपूर विशेष
ट्रेन क्रमांक ०११२१ : खामगावहून दि. १४ आणि १७ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता पंढरपूरला पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ०११२२ : दि. १५ आणि १८ जुलै रोजी सकाळी ५ वाजता पंढरपूरहून सुटेल आणि रात्री ७.३० वाजता खामगावला पोहोचेल.
लातूर-पंढरपूर स्पेशल
ट्रेन क्रमांक ०११०१ : लातूरहून दि. १२, १५, १६, १७ आणि १९ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता सुटेल आणि दुपारी १२.५० वाजता पंढरपूरला पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ०११०२ : पंढरपूरहून दि. १२, १५, १६, १७ आणि १९ जुलै रोजी दुपारी १.५० वाजता सुटेल आणि लातूरला रात्री ७.२० वाजता पोहोचेल.
भुसावळ-पंढरपूर अनारक्षित विशेष
ट्रेन क्रमांक ०११५९ : भुसावळहून दि. १६ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता सुटेल आणि पंढरपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी ३.३० वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ०११६० : पंढरपूरहून दि. १७ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता सुटेल आणि भुसावळला दुसऱ्या दिवशी १ वाजता पोहोचेल.
मिरज-पंढरपूर आणि मिरज-कुडूर्वाडी अनारक्षित मेमू विशेष (दि. १२ ते २१ जुलै)
* ट्रेन क्रमांक ०११०७ : मिरजहून सकाळी ५ वाजता सुटेल आणि पंढरपूरला रात्री ७.४० वाजता पोहोचेल.
* ट्रेन क्रमांक ०११०८: पंढरपूरहून सकाळी ९.५० वाजता सुटेल आणि मिरजला दुपारी १.५० वाजता पोहोचेल.
* ट्रेन क्रमांक ०१२०९ : मिरजहून दुपारी ३.१० वाजता सुटेल आणि कुर्डवाडीला रात्री ७ वाजता पोहोचेल.
* ट्रेन क्रमांक ०१२१० : कुडुर्वाडीहून रात्री ९.२५ वाजता सुटेल आणि मिरजला दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता पोहोचेल.




