India-Maldives Ties : सामायिक लोकशाही मूल्ये हा भारत-मालदीव विशेष संबंधांचा आधार – मुनू महावर

India-Maldives Ties : भारत आणि मालदीवमधील विशेष संबंध दोन्ही देशांच्या सामायिक लोकशाही मूल्यांवर आधारित असल्याचे भारतीय उच्चायुक्तांनी म्हटले आहे. मला भारताचे मालदीवसोबतचे संसदीय संबंध मजबूत करायचे आहेत. भारतीय उच्चायुक्त मुनू महावर यांनी गुरुवारी मालदीव संसदेचे अध्यक्ष अब्दुल रहीम अब्दुल्ला यांची शिष्टाचार भेट घेतली. भेटीदरम्यान त्यांनी भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
यापूर्वी महावर यांनी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची भेट घेतली होती. यादरम्यान, त्यांनी दोन्ही देशांमधील संबंध आणि द्विपक्षीय सहकार्याला चालना देण्यासाठी आपल्या अतूट वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. यादरम्यान दोन्ही देशांनी हिंदी महासागर क्षेत्रात शांतता आणि स्थैर्यासाठी काम करण्यावर सहमती दर्शवली.
दरम्यान, चीनकडे झुकणारे मोहम्मद मुइज्जू मालदीवचे अध्यक्ष झाल्यानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारत आणि मालदीवमध्ये तणाव निर्माण झाला होता. यादरम्यान मुइज्जू यांनी भारताला विमानाच्या प्लॅटफॉर्मवर कार्यरत असलेले 90 भारतीय सैनिक मागे घेण्यास सांगितले होते. यानंतर 10 मे रोजी भारताने आपले सैन्य मागे घेतले होते. त्या बदल्यात भारताने काही नागरी कर्मचारी ज्यात डॉर्नियर एअरलाईन आणि दोन हेलिकॉप्टर मालदीवला पाठवले. मालदीवचे राष्ट्रपती अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभात सहभागी झाले होते.
Israel-Hamas war : गाझाच्या मानवतावादी आपत्तीवर गप्प बसणार नाही – कमला हॅरिस
भारताने मालदीवच्या बजेटमध्ये केली आहे कपात…
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षीच्या 770 कोटी रुपयांच्या तुलनेत यावर्षी मालदीवला विकास सहाय्यासाठी केवळ 400 कोटी रुपये दिले आहेत. गेल्या वेळेच्या तुलनेत हे प्रमाण केवळ 52 टक्के आहे, म्हणजेच मालदीवला देण्यात येणारी मदत 48 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. मालदीव आणि भारत यांच्यातील राजनैतिक संबंध यावर्षी जानेवारीच्या सुरुवातीला ताणले गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यादरम्यान मालदीवच्या काही खासदारांनी अपमानास्पद वक्तव्य केल्याने दोन्ही देशांमध्ये वाद निर्माण झाला होता. मात्र, नंतर या खासदारांना निलंबित करण्यात आले होते.




