खोटं बोल पण रेटून बोल; धनंजय मुंडे एवढंच करतात- पंकजा मुंडे

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर भाजपला मतदान न होणाऱ्या बूथची यादी मागितल्याचा आरोप केला होता. तसेच हा ईव्हीएम हॅकींगचा प्रकार तर सुरू नाही ना?, अशी शंका सुद्धा उपस्थित केली. दरम्यान पंकजा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना धनंजय मुंडेंवर जोरदार पलटवार केला आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, खोटं बोल पण रेटून बोल आणि माझ्यावर आरोप कर हे धनंजय मुंडेंचं एकमेव ध्येय आहे. ते माझे बंधू आहेत त्यामुळे त्यांना मी लहानपणापासून ओळखते, खोटं बोल पण रेटून बोल एवढंच ते करतात.

त्या पुढे म्हणाल्या, बीडमध्ये अजून तरी कोणत्याही बूथची यादी मागवलेली नाही. निकालानंतर आपल्याला कोणत्या भागात किती मतदान झालं याची माहिती प्रत्येक नेत्यालाच मिळते. तसेच कोणत्या भागातून आपल्याला किती मतदान झाले याचा आढावा सुद्धा प्रत्येक जण घेतो, धनंजय मुंडेंनीही तो आढावा घेतलाच असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.