Elon Musk : आयफोनला टक्कर? इलॉन मस्क आणणार नवा ‘एआय’ हँडसेट!
Elon Musk : इलॉन मस्क यांच्या 'स्पेस-एक्स' कंपनीने मानवाचा कृत्रिम बुद्धिमत्तेशी (एआय) संवाद साधण्याचा मार्ग बदलण्याच्या उद्देशाने एका हँडसेटसारख्या उपकरणाचा प्रोटोटाइप (नमुना) विकसित केला आहे.

Elon Musk : इलॉन मस्क यांच्या ‘स्पेस-एक्स’ कंपनीने मानवाचा कृत्रिम बुद्धिमत्तेशी (एआय) संवाद साधण्याचा मार्ग बदलण्याच्या उद्देशाने एका हँडसेटसारख्या उपकरणाचा प्रोटोटाइप (नमुना) विकसित केला आहे. कंपनीच्या आगामी मोठ्या ‘इनिशिअल पब्लिक ऑफरिंग’ (आयपीओ) पूर्वी हा प्रोटोटाइप काही निवडक गुंतवणूकदार आणि भागधारकांना दाखवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Elon Musk)
हा प्रोटोटाइप आयफोनपेक्षाही अधिक स्लिम आणि आकर्षक डिझाइनचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे उपकरण एका खास ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल आणि यात मस्क यांच्या ‘एक्स-एआय’ मधील प्रगत एआय तंत्रज्ञान समाविष्ट केले जाईल. तसेच, यामध्ये ‘क्वालकॉम स्नॅपड्रॅगन’ चिपसेटचा वापर केला जाणार आहे. मात्र, हा प्रकल्प अजून सुरुवातीच्या टप्प्यावर असून, याचे डिझाइन बदलू शकते किंवा हे उपकरण प्रत्यक्षात बाजारात येईल की नाही, हे अद्याप निश्चित नाही. (Elon Musk)
हे उपकरण मस्क यांच्या ‘एव्हरीथिंग ॲप’ (सुपर ॲप) च्या संकल्पनेवर आधारित आहे. चीनमधील ‘वीचॅट’ प्रमाणेच एकाच प्लॅटफॉर्मवर पेमेंट्स, मेसेजिंग आणि फूड डिलिव्हरीसारख्या सर्व सेवा एआय एजंट्सच्या मदतीने देण्याचा मस्क यांचा विचार आहे. सध्या मस्क यांचा ‘एक्स-एआय’ चॅटबॉट प्रामुख्याने अँपल किंवा अँड्रॉइडवर अवलंबून आहे, त्यामुळे हे उपकरण त्यांचे इतर कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करू शकते. (Elon Musk)
Elon Musk : आयफोनला टक्कर? इलॉन मस्क आणणार नवा ‘एआय’ हँडसेट!
मस्क यांनी भूतकाळात स्मार्टफोन बनवण्याच्या कल्पनेला नकार दिला होता आणि सोशल मीडियावर, आम्ही कोणताही फोन विकसित करत नाही, अशी पोस्टही केली होती. तथापि, ओपनएआय आणि बाइटडान्ससारख्या जागतिक कंपन्या देखील सध्या अशा प्रकारची विशेष एआय हार्डवेअर उपकरणे विकसित करत आहेत, ज्यामुळे एआय क्षेत्रातील ही स्पर्धा आता अधिक तीव्र झाली आहे. (Elon Musk)





