वाहनांच्या काचा फोडल्या, भाजप समर्थकांवर आरोप
लखनौ – उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात माजी कॅबिनेट मंत्री आणि सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली.
दगडफेकीमुळे अनेक वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. या प्रकरणाचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांवर करण्यात आला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांची मुलगी भाजप खासदार संघमित्रा मौर्य म्हणाल्या की, त्यांच्या वडिलांवर भाजपच्या लोकांनी
हल्ला केला आहे.
कुशीनगरमध्ये स्वामी प्रसाद मौर्य यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकीत सुमारे डझनभर वाहनांच्या काचा फुटल्या. मौर्य यांचे समर्थक पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ प्रचारासाठी जात होते. खलवा पट्टी गावात ही घटना घडली. या घटनेनंतर सपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. दगडफेकीेनंतर मौर्य यांच्या समर्थकांनी रास्ता रोको करून निदर्शने केली.