अक्षय कुमारच्या ‘हैवान’ चित्रपटात साऊथ सुपरस्टारची एन्ट्री; चाहत्यांनी व्यक्त केला आनंद

Haiwan Film | अभिनेता अक्षय कुमार आणि सैफ अली खान मुख्यभूमिकेत असलेल्या ‘हैवान’ चित्रपटाची अपडेट समोर आली आहे. यात आता मल्याळम चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार काम करणार आहे. ‘हैवान’ चित्रपटात साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांची एन्ट्री होणार आहे.
मोहनलाल यांनी ‘हैवान’च्या शूटिंगला सुरुवात केली असून, याबद्दलची माहिती दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी सोशल मीडियावर दिली आहे. प्रियदर्शन यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सैफ अली खान आणि मोहनलाल यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यात त्यांच्यासोबत एक लहान मुलगीही दिसत आहे. त्यामुळे आता या चित्रपटाबाबतची चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.
View this post on Instagram
या फोटोला कॅप्शन देत प्रियदर्शन यांनी लिहिले की, “आयुष्य कसं बदलतं ते पहा. मी इथे ‘हैवान’च्या शूटिंग सेटवर आहे, माझ्या सर्वात मोठ्या क्रिकेट नायकांच्या मुलासोबत आणि माझ्या आवडत्या चित्रपट अभिनेत्यासोबत (मोहनलाल) काम करत आहे. खरंच, देव खूप दयाळू आहे.”
प्रियदर्शन यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये मोहनलाल आणि सैफ अली खान दोघेही काळ्या रंगाचे चष्मे आणि हातात काठी घेऊन दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मोहनलाल या चित्रपटात कॅमिओ भूमिकेत दिसणार आहे. ते एका चित्रपटात अंध व्यक्तीची भूमिका साकारत असण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या भूमिकेबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. Haiwan Film |
हेही वाचा:
शिंदेसेनेतील आमदाराच्या जावयाला बिहारने नाकारलं; खाकी सोडून राजकारणात एन्ट्री घेताच पदरी पडली निराशा





