IND vs SA T20I Series : भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी द.आफ्रिकेचा संघ जाहीर, जॅनसेन-कोएत्झीचे संघात पुनरागमन…

जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिका संघाचा वेगवान गोलंदाज मार्को जॅनसेन व गेराल्ड कोएत्झी हे भारताविरुद्धच्या तीन सामान्यांच्या टी-२० मालिकेसाठी संघात पुनरागमन केले आहे. गुरुवारी दक्षिण आफ्रिकेने या मालिकेसाठी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली. अष्टपैलू मिहलाली मपोंगवाना व अनकॅप्ड अँडिले सिमेलाने याला देखील प्रथमच संघात स्थान मिळाले आहे.
भारताविरुद्ध १० नोव्हेंबरपासून तीन सामान्यांच्या लढतींना सुरुवात होणार असून दुसरा सामना १२ नोव्हेंबर रोजी तर तिसरा सामना १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. श्रीलंकेविरुद्ध दोन सामान्यांच्या कसोटी मालिकेसाठी तयारी करत असलेल्या लुंगी एनगिडीचा समावेश या संघात करण्यात आलेला नाही. तसेच वेगवान गोलंदाज ॲनरिक नॉर्टजे आणि फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सी हे करारातून बाहेर पडल्याने त्यांचा देखील विचार करण्यात आला नाही.
एडन मार्करामकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले असून हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर आणि केशव महाराज यासारखे वरिष्ठ खेळाडू या संघाचा भाग आहेत. मात्र कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या कासिगो रबाडाला विश्रांती देण्यात आली आहे. भारताने मागील आठवड्यात आपल्या टी-२० संघाची घोषणा केली होती. कर्णधार सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
IPL 2025 Retention : चेन्नई सुपर किंग्सकडून 5 खेळाडू रिटेन, यादी पाहून चाहत्यांना मिळेल दिलासा…
दक्षिण आफ्रिका टी-२० संघ : एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली मपोंगवाना, न्काबा पीटर, रायन रिकेल्टन, अँडिले सिमेलाने, लुथॉस्टन, सेंट ट्रिब्युब्स .





