दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजयची Instagramवर धडाकेबाज एंट्री, काही तासातच झाले ‘इतके’ फॉलोवर्स
Updated On:

मुंबई – दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजय त्याच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. मात्र आता एका वेगळ्या कारणामुळे तो चर्चेत आला आहे. हल्ली सिनेक्षेत्रातील सर्वच कलाकार हे इन्स्टाग्रामवर सक्रिय असतात. मात्र याला थलपती विजय हा अपवाद होता. मात्र आता त्याने इन्स्टाग्रामवर एंट्री केली आहे. सोशल मीडियावर त्याची एंट्री अवघ्या काही तासातच त्याचे मिलियनच्या घरात फॉलोवर्स झाले आहेत.
थलपती विजयने ‘actorvijay’ या नावाने सोशल मीडियावर एंट्रीकेली आहे. काल अर्थात 3 एप्रिल 2023 रोजी त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ‘लिओ’ चित्रपटाच्या सेटवरील स्वतःचा एक फोटो त्याने शेअर केला. थलपती विजयने हा फोटो शेअर करत ‘हॅलो नानबाज अँड ननबीज’ असे म्हंटले आहे.
यातील त्याच्या लुकची देखील चांगलीच चर्चा रंगली होती. थलपती विजयच्या या पोस्टला काही तासांतच तब्बल 4 लाखांहून अधिक लाईक्स आले, तर साडेचार लाखांहून अधिक कमेंट्स आल्या होत्या. थलपती विजयने हा फोटो शेअर करत ‘हॅलो नानबाज अँड ननबीज’ असे म्हंटले आहे.
View this post on Instagram





