Malayalam Actor Joju George | प्रसिद्ध चित्रपट निर्माते मणिरत्नम आणि कमल हसन हे सध्या ‘ठग लाइफ’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. मात्र या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता जोजू जॉर्जला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटाच्या शूटींगदरम्यान स्टंट करताना त्याला दुखापत झाली. या चित्रपटाचे शूटिंग सध्या पुद्दुचेरी येथे सुरू आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठी केल्या जाणाऱ्या स्टंटसाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला होता. अचानक हा स्टंट करत असताना त्याला दुखापत झाली आणि त्याच्या डाव्या पायाचे हाड मोडले. यानंतर जोजू हा कोचीमध्ये परतला आणि त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने प्लास्टर करण्यात आले. सध्या त्याचा एक फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात त्याच्या पायाला दुखापत झाल्याचे दिसत असून त्याने काठीचा आधार घेतलेला दिसत आहे. Malayalam Actor Joju George| या दुखापतीनंतर डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. तसेच चाहत्यांनी देखील त्याच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, पुद्दुचेरीनंतर ‘ठग लाइफ’ चित्रपटाचे पुढील चित्रीकरण हे युरोपमध्ये होणार आहे. ठग लाईफ’ हा मणिरत्नम दिग्दर्शित गँगस्टर ॲक्शन ड्रामा आहे. कमल हसन आणि मणिरत्नम यांनी या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आहे. Malayalam Actor Joju George| या चित्रपटात कमल हसन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर त्रिशा, जोजू जॉर्ज, ऐश्वर्या लक्ष्मी, सिलांबरसन उर्फ सिम्बू, नस्सर, अशोक सेलवन आणि पंकज त्रिपाठी हे कलाकार देखील आहेत. Malayalam Actor Joju George| हेही वाचा : ‘स्त्री 2’ चा टीझर सोशल मीडियावर लीक