ICC Hall of Fame : गांगुली-पीटरसनसह अंजुम चोप्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’मध्ये झाला समावेश
ICC Hall of Fame : भारताचा माजी आक्रमक कर्णधार सौरव गांगुली, माजी महिला क्रिकेटपटू अंजुम चोप्रा आणि इंग्लंडचा माजी स्फोटक फलंदाज केविन पीटरसन यांचा प्रतिष्ठित 'आयसीसी हॉल ऑफ फेम' मध्ये समावेश करण्यात आला आहे.

ICC Hall of Fame 2026 Sourav Ganguly Anjum Chopra Kevin Pietersen : आयसीसीने क्रिकेट जगतात आपल्या खेळाची आणि नेतृत्वाची खास छाप सोडणाऱ्या तीन दिग्गज खेळाडूंचा सर्वोच्च सन्मान केला आहे. भारताचा माजी आक्रमक कर्णधार सौरव गांगुली, माजी महिला क्रिकेटपटू अंजुम चोप्रा आणि इंग्लंडचा माजी स्फोटक फलंदाज केविन पीटरसन यांचा प्रतिष्ठित ‘आयसीसी हॉल ऑफ फेम’ (ICC Hall of Fame) मध्ये समावेश करण्यात आला आहे. स्कॉटलंडमधील एडिनबर्ग येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात या तिघांना क्रिकेटमधील दिग्गजांच्या यादीत स्थान देत गौरविण्यात आले. या तिघांच्या समावेशानंतर हॉल ऑफ फेममधील एकूण सदस्यांची संख्या आता १२५ वर पोहोचली आहे.
जय शाह यांच्याकडून तिन्ही दिग्गजांचे अभिनंदन –
आयसीसीचे नवनियुक्त अध्यक्ष जय शाह यांनी या तिन्ही नव्या सदस्यांचे स्वागत करताना म्हटले, “क्रिकेटमधील असामान्य योगदानाबद्दल दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. सौरव, अंजुम आणि केविन यांनी केवळ आपापल्या राष्ट्रीय संघांचे यशस्वी नेतृत्व केले नाही, तर जगभरातील चाहत्यांचे प्रेम मिळवले. त्यांचे हे स्थान पुढील अनेक पिढ्यांना प्रेरित करत राहील.”
दिग्गजांच्या प्रतिक्रिया: ‘दादा’ भावुक, अंजुमच्या डोळ्यात पाणी!
I am delighted to welcome the latest inductees into the @ICC Hall of Fame, a tribute to the extraordinary individuals whose achievements have contributed greatly to our sport. @SGanguly99, @chopraanjum and @KP24 have all led their national teams with pride, and I would like to… pic.twitter.com/spGHYLvHWO
— Jay Shah (@JayShah) July 12, 2026
या ऐतिहासिक गौरवानंतर बोलताना भारताचा ‘दादा’ सौरव गांगुली म्हणाला, “हा माझ्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणे हे माझे भाग्य होते. हा कोणत्याही क्रिकेटपटूला मिळू शकणारा सर्वोच्च सन्मान आहे.”
𝘼 𝙣𝙞𝙜𝙝𝙩 𝙩𝙤 𝙧𝙚𝙢𝙚𝙢𝙗𝙚𝙧 ✨
ICC Chairman Jay Shah presented the ICC Hall of Fame honours to Kevin Pietersen and Anjum Chopra in Edinburgh 🤩 pic.twitter.com/tlcfTpNQma
— ICC (@ICC) July 12, 2026
दुसरीकडे, माजी महिला कर्णधार अंजुम चोप्रा भावुक होत म्हणाली, “देशाची जर्सी परिधान करणे हाच माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता. हा सन्मान माझ्या कारकिर्दीत योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे.” तर इंग्लंडच्या केविन पीटरसनने, “दिग्गजांच्या यादीत माझे नाव जोडले जाणे हा अत्यंत नम्र करणारा क्षण आहे,” अशा शब्दांत आयसीसी आणि कुटुंबाचे आभार मानले.
काय आहे ‘ICC Hall of Fame’?
Sourav Ganguly becomes the 10th Indian male player to get inducted to the ICC Hall of Fame.
Here are the all 10 legends:
1. Sunil Gavaskar (2009)
2. Bishan Singh Bedi (2009)
3. Kapil Dev (2010)
4. Anil Kumble (2015)
5. Rahul Dravid (2018)
6. Sachin Tendulkar (2019)
7. Vinoo… pic.twitter.com/WKDB59lBHr— TheFakeFakeer (@TheFakeFakeer) July 10, 2026
आयसीसीच्या शताब्दी वर्षानिमित्त जानेवारी २००९ पासून या पुरस्काराची सुरुवात झाली. क्रिकेटच्या विकासात आणि इतिहासात मोलाचे योगदान देणाऱ्या खेळाडूंनाच हा बहुमान मिळतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर किमान ५ वर्षांचा कालावधी पूर्ण केलेल्या खेळाडूंचाच यात समावेश केला जातो.





