केंद्राने 1417 कोटी कापल्याने सोरेन संतापले !
Soren was outraged when the Center cut Rs 1,417 crore

रांची – केंद्र सरकारकडून दामोदर व्हॅली कार्पोरेशनचे विजेचे जे एकूण 5500 कोटी रूपयांचे बिल देणे अपेक्षित होते त्यातील 1417 कोटी रुपये केंद्र सरकारने राज्य सरकारच्या खात्यातून कापून घेतले आहेत हा झारखंड राज्यावर केंद्राने केलेला अन्याय आहे हे आमचे पैसे आम्हाला त्वरित परत करावेत अशी मागणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.
केंद्र सरकारने घटनाबाह्य पद्धतीने आमचे पैसे कापले आहेत ते त्यांनी त्वरित परत द्यावेत केंद्राच्या या निर्णयामुळे झारखंड आणि केंद्र सरकार यांच्यातील संबंध बिघडले आहेत हे पैसे परत मिळाल्याशिवाय हे संबंध सुधारण्याची शक्यता नाही असेही सोरेन यांनी सुचित केले आहे.
अशा प्रकारे केंद्र सरकारने झारखंडसारख्या गरीब राज्याचे पैसे कापण्याचा उद्योग यापुढील काळात करू नये असेही सोरेन यांनी मोदींना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. मोदींशी थेट भेटून या विषयावर चर्चा करण्याची आपली इच्छा आहे, त्यासाठी मोदींनी वेळ द्यावी अशी मागणीही सोरेन यांनी केली आहे.
…………………….





