Sorana Cirstea Retires : दोन दशकांचा देदीप्यमान प्रवास अखेर संपला! रोमानियाच्या स्टार टेनिसपटू सोराना कर्स्टियाचा पराभवासह कोर्टला अलविदा
Sorana Cirstea Retires : हाँगकाँग ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत १३६ व्या क्रमांकाच्या रशियन खेळाडू अलेक्झांड्रा शुबालाद्झेकडून २-६, ३-६ ने पराभूत झाल्यानंतर, रोमानियाच्या ३४ वर्षीय सोराना किर्स्टियाच्या २० वर्षांच्या टेनिस कारकिर्दीला पूर्णविराम लागला.

Sorana Cirstea Retires Professional Tennis Hong Kong Open Quarterfinal : रोमानियाची ३४ वर्षीय स्टार टेनिस खेळाडू सोराना कर्स्टिया हिची तब्बल दोन दशके चाललेली गौरवशाली व्यावसायिक टेनिस कारकीर्द हाँगकाँग ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत झालेल्या अनपेक्षित पराभवासह संपुष्टात आली आहे. स्पर्धेत अव्वल मानांकित असलेल्या कर्स्टियाला जागतिक क्रमवारीत १३६ व्या स्थानावर असलेल्या रशियाच्या अवघ्या २१ वर्षीय अलेक्सांद्रा शुबलाद्जे हिच्याकडून २-६, ३-६ अशा सरळ सेटमध्ये पराभवाचा धक्का बसला. डिसेंबर २०२५ मध्येच २०२६ चा हंगाम हा आपल्या कारकिर्दीतील अखेरचा हंगाम असेल अशी घोषणा करणाऱ्या कर्स्टियाच्या या पराभवामुळे तिच्या प्रवासावर आता अधिकृतपणे पूर्णविराम लागला आहे.
पात्रता फेरीतून आलेल्या शुबलाद्जेचा आक्रमक खेळ; कर्स्टिया निष्प्रभ
पात्रता फेरीचा टप्पा पार करून मुख्य फेरीत धडक मारणाऱ्या शुबलाद्जेने सामन्याच्या सुरुवातीपासूनच कोर्टवर पूर्ण वर्चस्व राखले. पहिल्या सेटमध्ये तिने सलग चार गेम जिंकत आघाडी घेतली आणि सहजतेने पहिला सेट ६-२ असा खिशात घातला. कर्स्टियाला या सेटमध्ये मिळालेल्या ५ ब्रेक पॉइंट्सपैकी एकाचेही रूपांतर गुणांमध्ये करता आले नाही. दुसऱ्या सेटमध्ये १-३ अशा पिछाडीनंतर कर्स्टियाने झुंज देत स्कोअर ३-३ असा बरोबरीत आणला होता; मात्र त्यानंतर तिने दोनदा आपली सर्व्हिस गमावली. शुबलाद्जेने सलग तीन गेम जिंकत ६-३ ने सेट आणि सामना जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली.
कारकिर्दीतील सर्वोत्तम १५ वी रँकिंग आणि घरच्या मैदानावर जेतेपद –
Brutal loss from Cirstea in her last career match… unless she changes her mind (I kinda selfishly hope she does).
If this was really her last match… what a farewell season she had!
Career high ranking
Year end 15 or 16
10 Slam wins
42-18 W-L https://t.co/OHgJr7jN3g— José Morgado (@josemorgado) November 6, 2026
सन २००६ मध्ये व्यावसायिक टेनिसमध्ये पदार्पण करणाऱ्या सोराना कर्स्टियासाठी तिचा हा अखेरचा २०२६ चा हंगाम वैयक्तिक कामगिरीच्या दृष्टीने अत्यंत यशस्वी ठरला. या संपूर्ण हंगामात तिने ४२-१८ असा उत्कृष्ट विजय-पराभवाचा रेकॉर्ड नोंदवला. विशेष म्हणजे, आपल्या मायदेशात खेळल्या गेलेल्या क्लूज-नापोका स्पर्धेचे जेतेपद पटकावत तिने चाहत्यांना आनंद दिला होता. या सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीच्या जोरावर तिने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम म्हणजेच जागतिक क्रमवारीत १५ वे मानांकन गाठण्याचा ऐतिहासिक टप्पाही याच अखेरच्या टप्प्यात गाठला होता.
एशियन स्विंगनंतर टेनिस कोर्टला कायमचा रामराम –
Sorana Cirstea, 36, retires after best season while holding career-high No. 15 ranking: Frustrated by her quarterfinal loss to qualifier at the Prudential Hong Kong Tennis Open, 36-year-old Sorana Cirstea made an immediate decision that it was time to go after… dlvr.it/TWF4J7 https://t.co/pC8apcvfzm
— Puzzle-maker (@aboutsanjay) November 7, 2026
आशियाई दौऱ्यातील चार प्रमुख स्पर्धांमध्ये भाग घेतल्यानंतर कर्स्टियाने कोर्टवरून सन्मानाने पायउतार होण्याचा आपला निर्णय कायम ठेवला. तब्बल २० वर्षांपर्यंत जागतिक मंचावर रोमानियन टेनिसचा झेंडा अभिमानाने फडकवणाऱ्या या स्टार खेळाडूने कोणत्याही पुनरागमनाची शक्यता स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे. त्यामुळे हाँगकाँग ओपनमधील हा उपांत्यपूर्व सामना तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अधिकृतपणे अखेरचा सामना ठरला असून, टेनिस जगतातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.





