सोनू निगमला ‘या’ कारणामुळे पाकिस्तानी गायकाची मागावी लागली माफी; म्हणाला…

Sonu Nigam: सुप्रसिद्ध गायक सोनू निगम (Sonu Nigam) अनेकदा कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिला आहे. आता सोनू निगमवर एका पाकिस्तानी गायकाने गाणं चोरीचा आरोप केला आहे. सोनू निगमचे ‘सुन जरा’ हे गाणे पाकिस्तानी गायक ओमर नदीमने गायलेल्या ‘ए खुदा’ची कॉपी असल्याचे सांगितले जात होते. त्याने कमाल रशीद खान उर्फ केआरकेसोबत एक गाणे केले, त्यानंतर ‘ए खुदा’ हे पाकिस्तानी गाणे इंटरनेटवर व्हायरल झाले.
सोशल मीडिया युजर्सना सोनू निगमचं नवीन गाणं ‘सून जरा’ आणि उमर नदीमच्या गाण्यात साम्य आढळलं. त्यानंतर हे प्रकरण सुरू झालं. उमर नदीमने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एका गाण्याचा व्हिडिओ शेअर केला होता आणि कोणाचेही नाव न घेता टीका केली होती. गाण्याची चोरी करायची असेल तर किमान कलाकाराला श्रेय तरी द्यायला पाहिजे असं उमर म्हणाला होता. पाकिस्तानी गायक ओमर नदीमने केलेल्या आरोपांवर सोनूने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने उमरच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट करत आपली बाजू मांडत उमरची माफी मागितली. उमर नदीमच्या या पोस्टवर सोनू निगमने कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.
सोनूने गायलेलं गाणं केआरकेवर चित्रीत करण्यात आलं आहे. सोनू निगम म्हणाला, “माझा या गाण्याशी काहीही संबंध नाही. मला दुबईत माझे शेजारी असलेल्या केआरके (कमाल आर खान) यांनी गाण्याची विनंती केली होती आणि त्यानंतर मी त्यांना नकार देऊ शकलो नाही. मी सर्वांसाठी गाणं गात नाही. पण जर मी उमरचं गाणं ऐकलं असतं तर मी हे गाणं कधीच गायलं नसतं.”
View this post on Instagram
सोनू निगमला उत्तर देत उमर नदीम म्हणाला, “मी तुमच्याशी सहमत आहे, तुम्ही चोरी केली, असं मी म्हटलेलं नाही. पण या बातमीने नेहमीप्रमाणे वेगळं वळण घेतलं. मी तुमची गाणी ऐकत मोठा झालो आहे आणि तुमच्याकडून खूप काही शिकलो आहे. मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. लव्ह यू!”
पुढे सोनू उमर नदीमला म्हणाला, “तू माझ्यापेक्षा चांगलं गायलं आहेस. मला वाईट वाटतंय की मी तुझे गाणं ऐकलं नव्हतं. मी ते आता ऐकलं, खूप छान गाणं आहे आणि तू माझ्यापेक्षा चांगलं गायलं आहेस. तुला खूप सारे आशीर्वाद. तुला खूप आदर आणि प्रेम मिळो.” यावर उमर म्हणाला, “तुमचा हा मेसेज माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सध्या या जगात तुमच्यापेक्षा चांगला व बहुमुखी गायक कोणीही नाही. मी तुमचा खूप आदर करतो.” सध्या या दोघांच्याही पोस्टचे स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.





