‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील सोनू फोटोंमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर…

Nidhi bhanushali | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत भिडे मास्तरांची मुलगी सोनू भिडेची भूमिका अभिनेत्री निधी भानुशालीने साकारली होती. या मालिकेतील तिच्या भूमिकेला मोठी लोकप्रियता मिळाली. सध्या ती या मालिकेचा भाग नाही. मात्र सोशल मिडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. निधीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहे. मात्र या फोटोंवर चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, निधी सध्या तिच्या कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. ती तिच्या आईवडिलांसोबत गोव्याला फिरायला गेली होती. या व्हेकेशनचे फोटो तिने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यातील काही फोटोंमध्ये ती बिकिनी घालून स्विमिंग पूलजवळ पोझ देताना दिसत आहे. निधीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
एका फोटोमध्ये निधीसोबत तिच्या आईनेही मोनॉकिनी परिधान केल्याचं पहायला मिळतंय. त्यावरूनही नेटकऱ्यांनी टीका केली आहे. तर आई-वडिलांसमोर असे तोकडे कपडे घातल्याने निधीवरही काहींनी निशाणा साधला आहे.Nidhi bhanushali |
दरम्यान, निधीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे असे अनेक बोल्ड फोटो पाहायला मिळतात. यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. आता पुन्हा एकदा तिच्यावर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. Nidhi bhanushali |
हेही वाचा:





