प्रणवदांच्या कन्येचे सांत्वन करण्यासाठी सोनियांचे पत्र
Updated On:

नवी दिल्ली -कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी प्रणवदांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांना सांत्वनपर पत्र पाठवले.
प्रणवदा राष्ट्रीय जीवनाबरोबरच कॉंग्रेस पक्ष आणि केंद्र सरकारचे प्रदीर्घ काळ अविभाज्य आणि महत्वाचे घटक राहिले. त्यांचे बुद्धिचातुर्य, अनुभव, मौलिक सल्ला आणि अनेक विषयांचा सखोल अभ्यास यांची उणीव आम्हाला तीव्रतेने भासेल. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले, अशी भावना सोनियांनी व्यक्त केली.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरून भावना मांडत प्रणवदांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.





