सोनिया गांधींची प्रकृती बिघडली, दिल्लीतील रुग्णालयात दाखल

Sonia Gandhi | काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोटाशी संबंधीत समस्येमुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशात देखील एका खासगी भेटीवर असताना त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
हिमाचलमध्ये ७ जूनला त्यांची तपासणी झाली, त्यावेळी सोनिया गांधी यांना रक्तदाबाचा त्रास झाला होता. त्यांना शिमला येथील एका हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी नेले होते. याशिवाय, फेब्रुवारी महिन्यातही त्यांना पोटाच्या त्रासामुळे सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. Sonia Gandhi |
Congress Parliamentary Party Chairperson Sonia Gandhi has been admitted to Sir Ganga Ram Hospital in Delhi. She has been admitted to the gastro department due to stomach-related problem and is under observation: Sir Ganga Ram Hospital pic.twitter.com/LT40WAYD1L
— ANI (@ANI) June 15, 2025
सोनिया गांधींच्या प्रकृतीत सातत्याने चढउतार
ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या सध्या ७८ वर्षांच्या आहेत. त्यांची प्रकृतीत गेल्या काही वर्षात चढउतार होत आहेत. त्यांची प्रकृती अनेक वेळा बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. सोनिया गांधी यांना २०२३ मध्ये श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे त्यांना गंगाराम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. हा त्रास संसर्गामुळेमुळे झाला होता. त्यासंबंधी त्यांना योग्य उपचार देण्यात आले होते. याशिवाय त्यांना २०२२ मध्ये कोरोनाची लागण झाली होती, त्यावेळीही त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून होती. Sonia Gandhi |
हेही वाचा:
Maharashtra Weather : राज्यात धडकी भरवणारा पाऊस, पुणे-मुंबईत धो-धो; रायगडला रेड अलर्ट





