Ashok Kharat : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढत होत असल्याचे दिसत आहे. भविष्यवाणीच्या नावाखाली महिलांचे शोषण करणे, आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग करणे आणि करोडोंची फसवणूक करणे अशा गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. यात खरातचे अनेक राजकीय मंडळींसोबतचे फोटो देखील समोर आल्याने याप्रकरणाने एकच खळबळ उडाली. इतकेच काय तर, ईडीने खरातविरोधात मोठी कारवाई केली आहे. नाशिकसह पुणे शिर्डी येथील त्याच्या २५ ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली. यात ईडीने आलिशान गाड्यांसह ४२ लाख रुपयांची कॅश जप्त केली आहे. ईडी आणि आयकर विभागाच्या हाती अनेक महत्त्वाची कागदपत्रं लागली आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी एक मोठा दावा केला आहे. अशोक खरातचा एन्काऊंटर होऊ शकतो, असं वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केलं आहे. Ashok Kharat Praniti shinde प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या? भोंदू बाबा अशोक खरातचे धागेदोरे सत्तेत असलेल्या लोकांपर्यंत पोहोचू शकतात, त्यामुळे त्याचा एन्काऊंटर होऊ शकतो. हे प्रकरण फक्त एका बाबापुरते मर्यादित नाही. या प्रकरणाचे धागेदोरे सत्तेत बसलेल्या काही बड्या नेत्यांपर्यंत पोहचू शकतात. जर खरातने चौकशीदरम्यान या नेत्यांची नावे घेईल, तर ती माहिती बाहेर येऊ नये म्हणून त्याचे एन्काउंटर केले जाऊ शकते. Ashok Kharat पुरावे नष्ट करण्यासाठी त्याला मारले जाण्याची शक्यता आहे, असा मोठा दावा प्रणिती शिंदे यांनी केला आहे. एकीकडे आपण महिला आरक्षणाबद्दल बोलतो, पण तुमचे विचारच महिलांच्या विरोधातले असतील तर तुम्ही आरक्षण कसं लागू करणार? असा सवालही प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, अशोक खरातचं प्रकरण समोर आल्यानंतर त्याचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे कनेक्शन उघडकीस आले. तो रुपाली चाकणकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर, संजय शिरसाट अशा मोठ्या राजकीय नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. Ashok Kharat हेही वाचा: India-US Talks: “आम्हा सर्वांचं तुमच्यावर प्रेम आहे”; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प– पीएम मोदी यांच्यात 40 मिनिटे संवाद, होर्मुझ नाकेबंदी व पश्चिम आशियातील तणावावर चर्चा