G-23 चा वाढता दबाव, सोनिया गांधी घेऊ शकतात आज गुलाम नबी आझाद यांची भेट

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आज गुलाम नबी आझाद यांची भेट घेऊ शकतात. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. ही भेट आझाद यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या G-23 गटाच्या कोअर ग्रुपच्या बैठकीनंतर होणार आहे.
काँग्रेस नेतृत्वाने पक्षातील असंतुष्ट ‘G23’ गटापर्यंत पोहोचून त्यांची बाजू ऐकून घेण्याचा पर्यंत केला आहे. त्याअंतर्गत हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांनी गुरुवारी राहुल गांधी आणि गटाचे प्रमुख सदस्य गुलाम नबी आझाद यांची भेट घेतली. दरम्यान गुलाम नबी आझाद आज पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊ शकतात.
‘G23’ गटाशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की या नेत्यांनी काँग्रेसला बळकट करण्यासाठी आवश्यक असलेल्या पावलांवर चर्चा केली आहे. पक्षाचे संघटन बळकट करणे हाच आपला हेतू असल्याची भूमिका आपण नेतृत्त्वापर्यंत पोहोचवणार असल्याचेही त्यांनी ठरवले, जेणेकरून ‘भारताची कल्पना’ जतन करता येईल, कारण ते केवळ काँग्रेसच करू शकते.’





