Sonam Wangchuk : सोनम वांगचुक दोन महिने नजरकैदेत; रॅली आणि मिरवणुकांमध्ये सहभागी होण्यास मनाई
Sonam Wangchuk : लडाखमध्ये ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या हिल कौन्सिल निवडणुकांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

Sonam Wangchuk : – हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना लडाखमध्ये दोन महिन्यांसाठी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. लेहच्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सार्वजनिक रॅली आणि मिरवणुकांमध्ये सहभागी होण्यास मनाई करणारा आदेश जारी केला आहे.
लडाखमध्ये ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या हिल कौन्सिल निवडणुकांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. वांगचुक आणि स्थानिक संघटना हिवाळ्याच्या हंगामात निवडणुका घेण्याच्या निर्णयाला विरोध करत आहेत.
लेह पोलीस प्रमुखांनी सादर केलेल्या अहवालाच्या आणि प्रतिबंधात्मक कारवाईच्या मागणीच्या आधारे प्रशासनाने हा आदेश जारी केला आहे. भारतीय नागरी सेवा संहितेचे कलम १६३ लागू करण्यात आले आहे. आदेशानुसार, हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू होईल आणि ६० दिवसांसाठी अंमलात राहील.
औपचारिक आदेश जारी होण्याच्या काही तास आधी, सोनम वांगचुक यांनी एक पोस्ट करून आपण नजरकैदेत असल्याचा दावा केला होता. त्यांच्या घराभोवती मोठ्या संख्येने सशस्त्र सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत आणि त्यांना घराबाहेर पडण्याची परवानगी नाही.
सरकार मला घरीच राहण्याचा सल्ला देत आहे, पण प्रत्यक्षात मी नजरकैदेत आहेत. लेहमध्ये गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचारावरील न्यायिक चौकशी आयोगाच्या अहवालास होणारा विलंब आणि कडाक्याच्या थंडीत घाईघाईने निवडणुका घेण्यावर माझा आक्षेप आहे. सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माझी पोहोच लक्षणीयरीत्या कमी झाली आहे, असे





