Sonam Wangchuk: “…तर मी उपोषण मागे घ्यायला तयार”; सोनम वांगचूक यांनी केंद्र सरकारपुढे ठेवल्या ‘या’ 3 अटी
Sonam Wangchuk:

Sonam Wangchuk: दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर आमरण उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचूक यांना पोलिसांनी बळजबरीने सफदरगंज रुग्णालयात दाखल केला. सोनम वांगचुक यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असतानाही आंदोलन सुरूच आहे. आता त्यांनी उपोषण मागे घेण्यासाठी केंद्र सरकारकडे पुढे काही अटी ठेवल्या आहेत. सोनम वांगचूक यांनी आमरण उपोषण मागे घेण्याची तयारी दर्शवत, सरकारने जर आमच्या ३ मागण्यांपैकी एक मागणीही पूर्ण केली तर मी माझं उपोषण सोडेन,’ असे सांगितले आहे.
सोनम वांगचूक यांनी ट्विट करत केंद्र सरकारसमोर तीन अटी ठेवल्या आहेत.
1. केंद्र सरकारने नीट परीक्षा पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील अलीकडच्या काळातील जबाबदारी जबाबदारी घ्यावी.
2. जर मला आणि सीजेपीचे प्रमुख अभिजीत दिपके यांना संसदेपर्यंत जाऊ देण्यात आले आणि तेथील खासदारांनी आम्हाला नीट पेपरफुटी प्रकरणावर संसदेत आवाज उठवण्याचे आश्वासन दिले तर मी आमरण उपोषण मागे घ्यायला तयार आहे.
3. जर माझ्या तब्येतीच्या कारणामुळे मला संसदेत जाता आले नाही तर खासदार आणि अन्य नेत्यांनी सफदरगंज रुग्णालयात येऊन मला वरील सर्व गोष्टींबाबत आश्वासन द्यावे.
मला अनधिकृत पद्धतीने ताब्यात ठेवण्यात आलेल्या सफदरगंज रुग्णालयातून हे मी सांगत आहे. सध्या मी हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर नजरकैदेचा सामना करत आहे. याठिकाणी माझ्या हालचालींवर, बोलण्यावर आणि संपर्क साधण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत, असे सोनम वांगचूक यांनी ट्वीटमध्ये म्हंटले.
सीसीटीव्ही कॅमेरेही बंद, बॅरिकेडस हटवले
सोनम वांगचूक यांच्यानंतर आता अभिजीत दिपके स्वत: आमरण उपोषणाला बसले आहे. आज कॉकरोच जनता पार्टीकडून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दिवशी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याकरिता रविवारी मध्यरात्रीपासून जंतरमंतर परिसरात पोलिसांच्या हालचालींना वेग आला आहे. दिल्ली पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकाचे जवान याठिकाणी मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले आहेत. या भागात लावलेले बॅरिकेडस हटवण्यात आले असून सीसीटीव्ही कॅमेरेही अचानक बंद करण्यात आले आहेत. यासोबतच परिसरात जॅमर लावण्यात आली आहे. त्यामुळे जंतरमंतरवरील आंदोलक प्रचंड सावध झाले आहेत.
हेही वाचा:
Khadakwasla Dam: पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! खडकवासला धरणात गेल्या वर्षापेक्षा ५.६१ टीएमसी कमी





