Sonam Raghuwanshi : पती – पत्नी और ‘वो’; राजा रघुवंशीच्या हत्येपूर्वीचा शेवटचा व्हिडीओ समोर

इंदूर : मागच्या काही दिवसांपासून राजा – सोनम रघुवंशी प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. मेघालय पोलिसांनी राजा रघुवंशी हत्या प्रकरणात त्यांची पत्नी सोनम, प्रियकर राज आणि त्यांच्या ३ साथीदारांना अटक केली आहे. या प्रकरणात आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. राजाची हत्या होण्याच्या काही मिनिटांपूर्वीचा व्हिडिओ समोर आला आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये?
मेघालयातील डबल डेकर रूट ब्रिजवर प्रवास करताना एका पर्यटकाने हा व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये राजा आणि सोनम दिसत आहेत. हा व्हिडीओ 23 मे 2025 रोजी सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारासचा आहे. इन्स्टाग्राम युजर m_devsingh याने हा व्हिडीओ अपलोड केला आहे. आपल्या इन्स्टा पोस्टमध्ये त्याने म्हटले की, हा व्हिडीओ डबल डेकर रुट ब्रीज फिरण्याच्या दरम्यानचा आहे.
View this post on Instagram
23 मे 2025 रोजी मेघालयातील डबल रुट ब्रिज फिरण्यासाठी गेलो होतो. मात्र, एकदा शूट केलेला व्हिडीओ पाहत असताना इंदूरमधील हे जोडपं दिसलं. या व्हिडीओची रेकोर्डिंग सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारासची आहे. त्यावेळी ट्रॅव्हलर m_devsingh हा उतरत होता. तर, सोनम आणि राजा हे नोंगिरियाट गावात रात्रीचा मुक्काम केल्यानंतर सकाळी डोंगरावर चढत होते.
पोलिसांना होईल मदत
m_devsing या युजर्सने राजा आणि सोनमचा हा शेवटचा व्हिडीओ असावा, असे म्हटले आहे. व्हिडीओत सोनमने व्हाइट शर्ट घातला आहे. हा शर्ट राजाजवळ आढळला होता. मेघालय पोलिसांना या व्हिडीओची मदत होईल, अशी अपेक्षा या व्यक्तीने व्यक्त केली आहे.





