सोनाली कुलकर्णीची पती कुणालसोबत जंगल सफारी; शेअर केले खास फोटो

Sonali Kulkarni | मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या कामातून ब्रेक घेऊन पती कुणाल बेनोडेकरसोबत आफ्रिकेतील जंगलात सफारीचा आनंद लुटत आहे. तिने केनियातील मसाई मारा आणि टांझानियातील सेरेन्गेटी या जगप्रसिद्ध नॅशनल पार्क्सची सफर केली आहे. येथील सुंदर फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.
तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये सोनाली आणि तिचा पती जीपमधून जंगल सफारीचा अनुभव घेताना दिसत आहेत. सफारीदरम्यान त्यांनी सिंह, हत्ती, चित्ते, झेब्रा आणि इतर अनेक वन्य प्राणी पाहिले. या अनुभवामुळे तिच्या चाहत्यांमध्येही आफ्रिकेतील निसर्गाचा आणि वन्यजीवनाचा अनुभव घेण्याची उत्सुकता वाढली आहे.
सोनालीला विविध ठिकाणी फिरण्याची आवड आहे, विशेषकरुन ती भारताबाहेरील अनेक देशात भटकंती करत असते. सोनाली कुलकर्णीने जपान, इंग्लड, इंडोनेशिया, अमेरिका आणि दुबईसारख्या देशांमध्येही प्रवास केला आहे. येथील फोटो देखील तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. Sonali Kulkarni |
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिला खरी ओळख ‘नटरंग’ चित्रपटातील भूमिकेमुळे मिळाली. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. तिने नटरंग चित्रपटानंतर अनेक चित्रपट केले. यामध्ये ‘मितवा’, ‘हंपी’, ‘व्हिक्टोरिया एक रहस्य’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘गाढवाचं लग्न’, ‘पोश्टर गर्ल’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. Sonali Kulkarni |
हेही वाचा:





