सोनाली कुलकर्णीच्या घरी गणपती बाप्पा विराजमान; यंदाही घडवली स्वत:च्या हाताने मूर्ती

Sonali Kulkarni | दरवर्षीप्रमाणे यंदाच्या गणेशउत्सावानिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांकडून जल्लोषात बाप्पांची मिरवणूक काढून त्यांचं स्वागत केलं जात आहे. अनेक सेलिब्रिटींच्या घरी देखील मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे आगमन होते. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे. नुकतेच तिने सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केली आहे.
नेहमीप्रमाणे सोनालीने आपल्या भावासोबत मिळून स्वतः पर्यावरण पूरक गणपती बाप्पाची मूर्ती साकारली आहे. स्वतःच्या हाताने गणेशाला आकार दिला आहे. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर टाकला होता. जो आता चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला सोनालीने ‘यंदाचा बाप्पा …आमचा गणोबा’असं कॅप्शन लिहिलं आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली भावाच्या मदतीने बाप्पाची मूर्ती घडवताना दिसत आहे. Sonali Kulkarni |
View this post on Instagram
या सुंदर मूर्तीमध्ये गणपतीसोबत छोटा उंदीर मामा आणि शंकराची पिंड दिसत आहे. त्यानंतर आता तिने गणपतीच्या आगमनाचा देखील एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘आमचे बाप्पा विराजमान झाले’, असे म्हणत तिने गणपती बाप्पासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मराठीसोबतच हिंदी, दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपली छाप उमटवली आहे. सोनाली उत्तम नृत्यांगना देखील आहे. सध्या सोनाली कुलकर्णी ‘होऊ दे चर्चा…कार्यक्रम आहे घरचा!’ या कार्यक्रमात पाहायला मिळत आहे. Sonali Kulkarni |
हेही वाचा:
गणपती बाप्पा मोरया! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खास व्हिडिओ शेअर करत दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा





