पिवळ्या रंगाच्या साडीत सोनाली कुलकर्णीचे खुलले सौंदर्य; समुद्रकिनारी केले फोटोशूट

Sonali Kulkarni | अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अभिनयासह तिच्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केले आहे. सोनाली सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय असते. नुकतेच तिने समुद्रकिनाऱ्यावरील सुंदर फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत. दुबईतील समुद्राच्या रुपेरी वाळूवर तिने हे फोटोशूट केले आहे.
सोनालीने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “वो सर्दियों की धूप की तरह गुरूब हो गया, लिपट रही है याद जिस्म से लिहाफ़ की तरह….” पिवळ्या रंगाची गुलाबाच्या फुलांचं डिझाईन असेलली साडी, त्यावर न्यूड मेकअप असा आपला लुक तिने पुर्ण केला. या लूकमध्ये सोनाली अतिशय सिंपल पण तितकीच हॉट दिसत आहे. फोटोमध्ये तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. तिच्या या फोटोवर चाहत्यांकडून देखील लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. Sonali Kulkarni |
View this post on Instagram
सोनाली कुलकर्णीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने ‘नटरंग’, ‘मितवा’, ‘क्लासमेट्स’, ‘पोश्टर गर्ल’, ‘हिरकणी’ या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ‘नटरंग’ या मराठी चित्रपटातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. आजही तिच्या ‘अप्सरा आली’ या गाण्याने चाहत्यांना वेड लावले आहे. मराठीसह सोनालीने मल्याळम सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. ‘मलाइकोट्टई वलीबन’ चित्रपटात ती झळकली. हा चित्रपट हिंदी, कन्नड, तमीळ व तेलुगू या भाषांमध्येही डब करण्यात आला. Sonali Kulkarni |
हेही वाचा:
तमन्ना भाटिया प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात पोहचली; टीमसह ‘ओडेला २’चा टीझर केला रिलीज





