सोनाली कुलकर्णीने व्हायरल कवितेवर धरला ठेका; इंग्लंडमधील शेअर केला व्हिडिओ

Sonali Kulkarni | मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातूनतिचे अपडेट्स चाहत्यांना देत असते. अलीकडेच तिने एक व्हिडीओ इनस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात तिने एका व्हायरल कवितेवर ठेका धरला आहे.
या व्हिडिओमध्ये सोनालीने इंग्लडमध्ये मराठी कवितेचा ठसका तिच्या नृत्यातून दाखवून दिला आहे. तिचा डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वैभव जोशी यांच्या ‘मन तुझं जलतरंग लहरी तुझा साज..’ या कवितेच्या ओळी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक सेलिब्रिटींना या गाण्याची भुरळ पडली आहे.
अशातच सोनालीला सुद्धा या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरला नाही. सध्या सोनाली कामानिमित्त इंग्लंड दौऱ्यावर आहे. याठिकाणी मराठमोळा लूक करून सोनालीने व्हायरल गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे. तिच्या या व्हायरल कवितेच्या नृत्यानं चाहत्यांची मनं जिंकली आहे.
View this post on Instagram
हा व्हिडिओ शेअर करत सोनालीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “व्हायरल कवितेवर Reel व्हिडीओ बनवला नाही तर पाप लागेल…आणि ती संधी इंग्लंडमध्ये युरोपियन मराठी संमेलनच्या निमित्ताने मिळाली. अशी संधी मिळत असेल तर का बरं सोडावी?” तिच्या या व्हिडीओला अनेकांकडून पसंती मिळत आहे. सोनालीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. Sonali Kulkarni |
सोनाली कुलकर्णीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर ‘अप्सरा’ म्हणून ओळख मिळवलेल्या सोनालीने ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘मितवा’, ‘पोश्टर गर्ल’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. येत्या काळात ती ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या सिनेमात प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. Sonali Kulkarni |
हेही वाचा :
‘आम्ही खरेदी करणार नाही’ ; पाकचा चीनला मोठा धक्का, j-३५ लढाऊ विमानांबद्दल केले मोठे विधान





