त्या फोटो व्हिडिओवरून सोनाक्षी ट्रोल; नेटकऱ्यांच्या झहीर इकबाल कुठे आहे, प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली…

काल देशभरात धूळवूड मोठ्या उत्साही वातारणात साजरी करण्यात आली. राजकीय नेत्यांनी देखील रंगाची उधळण करत धूळवड सणाचा आनंद लुटला. अनेकांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून फोटो आणि व्हिडिओ शेअर करत धूळवडच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. तर दुसरीकडे बी टाऊनमधील सिताऱ्यांनीही रंगाची उधळण करत धूळवड जल्लोषात साजरा केली. सेलिब्रेटींनी धूळवडच्या शुभेच्छा देत आपले रंगानी माखलेले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेही धूळवड मोठ्या उत्साहात साजरी केली. तिने रंगाने माखलेले फोटो आणि व्हिडिओ तिच्या इन्स्टा अकाउंटवरून शेअर केले. मात्र, ती या फोटोत एकटीच दिसल्याने तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
आता यावरून ट्रोलिंगवर करणाऱ्यांना सोनाक्षी सिन्हाने चांगलचं सुनावलं आहे. सोनाक्षीच्या लग्नानंतर ही तिची पहिली होळी होती. 23 जून 2024 मध्ये तिने झहीर इकबालशी लग्न केलं. लग्नानंतरची सोनाक्षीची ही पहिली होळी होती, त्यामुळे ती तिच्यासाठी खूप खास होती. सोनाक्षीने शेअर केलेल्या फोटोत आणि व्हिडिओत तिचा पती झहीर इकबाल कुठेही न दिसल्याने ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली होती. यावर सोनाक्षीने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे.
‘मिसिंग यू बेबी’
झहीर इक्बाल आणि सोनाक्षीने एकत्र होळी साजरी का केली नाही असा प्रश्न ट्रोल करणाऱ्यांनी सोनाक्षीला केला होता. याविषयी उत्तर देताना तिने ट्रोलर्सला कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं की कमेंट्समध्ये थोडं रिलॅक्स करा. झहीर इकबाल मुंबईमध्ये आहे आणि मी शूटवर आहे. त्यामुळे आम्ही एकत्र नाही आहोत. डोक्यावर जरा थंड पाणी घाला. सोनाक्षीनं कमेंट करताना त्यावर झहीरनं देखील कमेंट केली आहे. ‘मिसिंग यू बेबी’. असे त्याने म्हटले आहे.





