सोनाक्षीने केली कोरोनाची चाचणी; पती जहीर म्हणाला ‘व्हायरल झाली’

Sonakshi Sinha | अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती जहीर इक्बाल सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकताच दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोनाक्षीची तब्येत बरी नसल्यामुळे तिने कोविड-१९ चाचणी केली होती. सुदैवाने ती निगेटिव्ह आली आणि तिने स्वतः तिच्या इंस्टा स्टोरीवर याबाबत माहिती दिली. यातच जहीरने इन्स्टाग्रामवर सोनाक्षीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाक्षी स्टीम घेताना दिसत आहे. यावर जहीर हा ‘घुंघट में चंदा है…’ हे गाणं मिश्कील पद्धतीने म्हणताना दिसत आहे. त्यांच्या या गोड क्षणांनी चाहत्याचं मन जिंकून घेतलं आहे.
जहीरनं हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलं, “ही मुलगी व्हायरल झाली आहे.” त्यानं हे वाक्य दुहेरी अर्थानं केले आहे. एक म्हणजे व्हायरल ताप आणि दुसरा म्हणजे हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. Sonakshi Sinha |
दरम्यान, सोनाक्षी आणि झहीर एकमेकांना बरेच वर्षे डेट करीत होते. २३ जून २०२४ ला त्यांनी मुंबईत नोंदणी पद्धतीनं लग्न केलं. त्यानंतर त्यांनी सर्वांना रिसेप्शन पार्टी दिली होती. त्यांच्या या पार्टीला कुटुंबातील व्यक्तींसह बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. येत्या २३ जून रोजी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहेत. Sonakshi Sinha |
हेही वाचा:
Pune Gramin : करडे-न्हावरे रस्त्यावर भीषण अपघात, वडिलांचा मृत्यू; मुलगा न्यायाच्या प्रतीक्षेत





