सोनाक्षी सिन्हाच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज; अभिनेत्री दिसणार खास अंदाजात

Sonakshi Sinha | अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘निकीता रॉय’ असं तिच्या या आगामी चित्रपटाचं नाव आहे. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमधील अभिनेत्रीचा लूक पाहून चाहत्यांच्या मनात चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
हा बहुप्रतिक्षित सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट 30 मे 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, अर्जुन रामपाल, परेश रावल आणि सुहैल नय्यर यांसारख्या उत्कृष्ट कलाकारांची दमदार स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सोनाक्षीचा कधीही न पाहिलेला अंदाज पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
कुश एस सिन्हा यांनी ‘निकिता रॉय’ हा चित्रपट दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.शिवाय या चित्रपटाची निर्मिती निक्की खेमचंद भगनानी, किंजल आहुजा घोन आणि विकी भगनानी यांनी केली आहे. हा चित्रपट ३० मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा प्रसिद्ध थ्रिलर लेखक पवन कृपलानी यांची आहे. Sonakshi Sinha |
हा चित्रपट आनंद मेहता, प्रकाश नंद बिजलानी, शक्ती भटनागर, मेहनाज शेख आणि प्रेम राज जोशी यांनी सहनिर्मित केला आहे. रहस्य, थरार आणि सायकोलॉजिकल स्तरांनी परिपूर्ण हा चित्रपट यंदाच्या सर्वात रंजक थ्रिलरपैकी एक ठरणार आहे.
हेही वाचा:
काँग्रेसची गळती सुरूच; संग्राम थोपटें पाठोपाठ आणखी एका बड्या नेत्याने दिला राजीनामा





