सोनाक्षी सिन्हाचा रौद्र अवतार; ‘जटाधारा’चा खतरनाक टीझर समोर

Sonakshi Sinha | अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आगामी ‘जटाधरा’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सोनाक्षीसोबत साऊथ अभिनेता सुधीर बाबू प्रमुख भूमिकेत आहे. तिच्या या चित्रपटाबाबत चाहते देखील उत्सुक होते. नुकतेच या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. ज्यात सोनाक्षीचा खतरनाक लूक पाहायला मिळत आहे.
सोनाक्षी सिन्हाने हा टीझर इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिलं आहे, “बलिदानातून जन्मलेला एक नायक आणि लोभातून वाढलेलं अंधाराचं साम्राज्य, संघर्षाची सुरुवात झाली आहे. ‘जटाधारा’चा टीझर आता प्रदर्शित झाला आहे.” टीझरमध्ये सोनाक्षी एक प्रभावी लूकमध्ये पाहायला मिळत आहे. Sonakshi Sinha |
View this post on Instagram
टीझरमध्ये सोनाक्षी सिन्हा एका शक्तिशाली आणि क्रूर देवीच्या रूपात दिसते. तिच्या चेहऱ्यावरचा राग, डोळ्यांतील अंगार आणि भेदक आवाज या सगळ्यामुळे सोनाक्षीचा लूक आजवरच्या सिनेमांपेक्षा वेगळा ठरतो. दुसरीकडे सुधीर बाबू शांत, पण दृढनिश्चयी योद्ध्याच्या रूपात आहे. सोनाक्षी आणि सुधीरमध्ये शेवटी युद्ध होताना पाहायला मिळतं. Sonakshi Sinha |
हा चित्रपट जी स्टुडिओच्या निर्मितीत आणि एस के जी एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार केला जात आहे. चित्रपटात भव्य व्हीएफएक्सचा समावेश असेल. ‘जटाधरा’चे दिग्दर्शन वेंकट कल्याण आणि अभिषेक जयसवाल यांनी केले आहे. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. Sonakshi Sinha |
हेही वाचा :
“ऑपरेशन सिंदूरमध्ये ५ पाकिस्तानी लढाऊ विमाने नष्ट” ; IAF प्रमुखांनी केला पाकचा पर्दाफाश





