Rakesh Roshan : दिग्गज फिल्ममेकर राकेश रोशन यांनी दिग्दर्शनाला केला रामराम

मुंबई : बॉलिवूड विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिग्गज फिल्ममेकर राकेश रोशन हे त्यांच्या हिट फिल्मी करिअरसाठी ओळखले जातात. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र आता त्यांनी दिग्दर्शन सोडणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेने अनेक चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे.
राकेश रोशन यांनी 2003 मध्ये ‘कोई मिल गया’ या सिनेमातून फ्रँचायझीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी 2006 मध्ये ‘क्रिश’ बनवत सुपरहिरो फ्रँचायझीमध्ये बदललं. त्यानंतर 2013 मध्ये ‘क्रिश 3’ बनवली. आणि आता जाता जाता त्यांनी ‘क्रिश 4’ चीही घोषणा केली. राकेश रोशनच्या ‘कोई मिल गया’, ‘क्रिश’, ‘कहो ना प्यार है’, यांसारख्या अनेक सिनेमांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यांच्या या चित्रपटाने अनेक विक्रमदेखील केले.
राकेश रोशन यांचा मुलगा हृतिक रोशन साठी कहो ना प्यार है हा चित्रपट करिअरला कलाटणी देणारा ठरला. आपल्या मुलाचे करिअर सेट करण्यात राकेश रोशन यांची महत्वपूर्ण भूमिका होती. आता राकेश रोशन यांनी दिग्दर्शनाला रामराम करण्याची घोषणा केल्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.





