बॉलीवूड अभिनेत्री राधिका आपटेने आपल्या दमदार अभिनयाच्या मदतीने चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. एका मुलाखतीत राधिका म्हणाली, कधी-कधी ब्रेक घेणे खूप महत्त्वाचे असते.सध्या जगात बऱ्याच गोष्टी घडत आहेत.
मी स्थिर राहून भविष्याचा विचार करत नसल्याचा मला आनंद आहे. कारण या क्षणी खुपच अनिश्चितता आहेत. सध्या जसा दिवस येत आहे, त्या पद्धतीने तो मी घालवती आहे. राधिका म्हणाली की, लॉकडाऊनमध्ये ती आपला जास्तीत जास्त वेळ काहीच न करता व्यतीत करत आहे. यावेळी ती उत्तम आहार आणि विश्रांती घेत आहे. तसेच रोज व्यायाम, चालणे, चित्रपट पाहणे आणि पुस्तके वाचत आहे. तथापि, मला आईची आणि कुटुंबाची आठवण येते.
आपल्या वैयक्तिक शैलीविषयी राधिका म्हणाली, मला त्यातील साधेपणा आणि अभिजातपणा आवडतो. तसेच मला स्वच्छता आणि सहजसोप्या गोष्टी आवडतात, असे तिने सांगितले.
राधिकाने याचीही पुष्टी केली आहे की, तिने अद्याप पुन्हा काम सुरू केलेले नाही. दरम्यान, काही काळापूर्वीच स्वीडिश ब्रॅंड डॅनियल वेलिंग्टनने आपल्या घड्याळाचे मॉडेल आयकॉनिक लिंक लुमेन भारतात लॉंच केले आहे. या ब्रॅंडशी राधिका गेली तीन वर्षे ऍम्बेसडर म्हणून काम करत आहे.