“सरकार वाचवण्यासाठी वेगळं काही…”; PM मोदींंनी सरन्यायाधीशांच्या घरी भेट देण्यावरून संजय राऊतांची टीका

Narendra Modi Meets CJI DY Chandrachud | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. सरन्यायाधीश आणि पंतप्रधानांमध्ये झालेल्या या भेटीनंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह प्रकरण तसेच राहुल नार्वेकरांनी दिलेला आमदार अपात्रतेचे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून याप्रकरणांची सुनावणी होत नसून यावरुनच विरोधकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. यातच पंतप्रधान मोदींनी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या घरी गणेशपूजा सोहळ्यानिमित्त लावलेल्या हजेरीमुळे चर्चांना उधाण आले आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “धनंजय चंद्रचूड देशाचे सरन्यायाधीश आहेत. नोव्हेंबर महिन्यात ते निवृत्त होत आहेत आणि पंतप्रधान गणेशोत्सवासाठी किती जणांच्या घरी गेले त्याची माझ्याकडे माहिती नाही. पण काल सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान आरतीसाठी गेले, त्यांच्या दोघांचा संवाद पाहण्यात आला आणि धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या घेणाऱ्या राष्ट्रामध्ये एक छान चित्र पाहायला मिळालं,”असं संजय राऊत म्हणाले.
“आमच्यासारख्यांच्या मनात प्रश्न आला, पंतप्रधानांशी इतकी राजकीय जवळीक असलेले न्यायाधीश मग ते कोणीही असो की महाराष्ट्रातल्या घटनाबाह्य सरकारच्या बाबतीत आम्ही जी लढाई लढतोय, त्यात आम्हाला न्याय का मिळत नाही? तारखांवर तारखा का पडत आहेत? याबाबत आमच्या मनात आता शंका आहे. सरन्यायाधीश पदावर चंद्रचूड यासारखी व्यक्ती असताना तीन वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवले जात आहे,” असं संजय राऊतांनी सांगितले.
संविधान के घर को आग लगी
घरके चिरागसे….
१) EVM को क्लीन चीट
२) महाराष्ट्र में चलरही संविधान विरोधी सरकार के सुनवाई पर ३ सालसे तारीख पे तारीख
३) प. बंगाल बलात्कर मामले मे suemoto हस्तक्षेप लेकीन
महाराष्ट्र रेप कांड का जिकर नहीं.
४) दिल्ली मुख्यमंत्री केजरीवाल के
bail पर तारीख पे… https://t.co/jzVpQqDQh3— Sanjay Raut (@rautsanjay61) September 11, 2024
“हे सरकार घटनाबाह्य आहे, असं सरन्यायाधीश स्वतः वारंवार सांगत राहिले तरी निर्णय आणि निकाल होत नाही आणि ते आता निवृत्तीला आले, काल त्यांच्या घरी पंतप्रधान पोहोचले त्यामुळे यामागे सरकार वाचवण्यासाठी वेगळं काही घडतंय का? शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षासारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष पूर्णपणे संपवण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का? या लोकांच्या मनातल्या शंका काल पक्क्या झाल्या,” असंही संजय राऊत म्हणाले.
पंतप्रधानांची सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट
दरम्यान, बुधवारी पंतप्रधानांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी सरन्यायाधीशांनी कुटुंबासह त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पीएम मोदींनी बाप्पाची आरती केली. यावेळी डोक्यावर गांधी टोपी घातल्याचे पंतप्रधान मोदी पाहायला मिळाले. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा:
काश्मीर खोऱ्यात केवळ 19 जागा लढवून भाजप जम्मू-काश्मीरमध्ये कसे बनवणार सरकार ?





