‘काही गोष्टींची नाव बदलतात, पण…’; सुष्मिता सेनसाठी रोहमन शॉलची खास पोस्ट

Sushmita Sen and Rohman Shaul | अभिनेत्री सुष्मिता सेन अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल काही वर्ष एकमेकांना डेट करत होते. मात्र २०२१ मध्ये सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दोघांनी ब्रेकअप झाल्याचं जाहीर केलं. त्यानंतरही दोघे अनेकदा एकत्र दिसले, पण दोघांनी त्यांच्या नात्याबाबत फारसं उघडपणे बोलणं टाळलं. यांनतर आता रोहमनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
सुष्मिता सेनबरोबरच्या मैत्रीला ७ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रोहमनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये तिचा चेहरा दिसत नाही. पण, ही पोस्ट त्यानं सुश्मिता सेनला टॅग केलीआहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहलं, “सात वर्षे पूर्ण! काही गोष्टींची नाव बदलतात. पण, त्यांचा अर्थ मात्र कायम असतो. मी तुला बुद्धिबळ शिकवलं आणि आता तू मला बिनदिक्कत हरवतेस. तू मला पोहायला शिकवलंस, पण पाण्याला घाबरणाऱ्या एका माणसाला तू भावनिकदृष्ट्याही आणि खर्या अर्थानंही खोल पाण्यात उतरवलंस. तू मला आतापर्यंतचे सर्वोत्तम हेअरकट्स दिलेस, हे तर मी विसरू शकत नाही.”
View this post on Instagram
पुढे त्यानं लिहलं, “आपण एकमेकांबरोबर आपली भीती, ताकद आणि सगळंच वाटून घेतलं. या सगळ्यातून एक असं नातं तयार झालं, जे कोणत्याच लेबलमध्ये बसत नाही. एकेकाळी तू माझं सुरक्षित स्थान होतीस आणि कदाचित अजूनही आहेस. आपल्यामध्ये असलेल्या प्रेमासाठी आणि आजही टिकून असलेल्या त्या मैत्रीसाठी मी मनापासून आभारी आहे”, या शब्दात त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. Sushmita Sen and Rohman Shaul |
तीन वर्षे अधिकृतपणे डेट केल्यानंतर त्या जोडप्याचा ब्रेकअप झाला होता, त्यानंतर सुष्मिता सेनने काही काळासाठी ललित मोदी यांना डेट केले होते. परंतु ललित मोदी यांच्याशी त्यांचे नाते फार काळ टिकले नाही, आणि त्यानंतर त्या पुन्हा रोहमन शॉल यांच्यासोबत दिसू लागल्या. तरीही, या जोडप्याने वारंवार स्पष्ट केले की ते डेट करत नाहीत, तर आता ते फक्त मित्र आहेत. Sushmita Sen and Rohman Shaul |
रोहमनसोबतच्या ब्रेकअपनंतर सुष्मिता सेनने काही काळासाठी ललित मोदी यांना डेट केले होते. परंतु ललित मोदी यांच्याशी तिचे नाते फार काळ टिकले नाही, आणि त्यानंतर ती पुन्हा रोहमन शॉलसोबत दिसू लागली. मात्र दोघांनीही वारंवार स्पष्ट केले की ते डेट करत नसून फक्त मित्र आहेत. Sushmita Sen and Rohman Shaul |
हेही वाचा





