“काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच…”; बॅग तपासणीवरून भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला; शेअर केला फडणविसांचा व्हिडिओ

BJP on Uddhav Thackeray | विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सभांनी जोर धरला आहे. दिग्गज नेते मंडळीच्या दौरे आणि सभा सुरू झाल्या आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. ज्याचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगासह भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला होता. वणीनंतर औसामध्ये उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली. त्यानंतर आता भाजपकडून उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
निवडणुकीच्या काळात अशा प्रकारची तपासणी होणं ही सामान्य बाब असल्याचे सांगत भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्याकडील बॅगेचीही तपासणी झाली असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडील बॅगांची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी झाल्याचे दिसत आहे.
जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते!
हा व्हीडिओ पहा, 7 नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यात आमचे नेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या बॅगची तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हीडिओ काढला, ना कोणती आगपाखड केली. तत्पूर्वी, 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर सुद्धा मा.… pic.twitter.com/ebkuigJE2E— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 13, 2024
हा व्हिडिओ शेअर करत भाजपने म्हंटले की, ‘जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा करण्याची सवयच असते! हा व्हिडीओ पाहा, ७ नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यात आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगची तपासणी झाली. पण, त्यांनी ना कोणता व्हिडीओ काढला, ना कोणती आगपाखड केली. त्यापूर्वी 5 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांच्या बॅग्जची तपासणी करण्यात आली होती.’ भाजप पक्षाकडून याबाबतचा व्हिडिओ सोशल मिडिया एक्स (पुर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून शेअर केला आहे.
तसेच दिखाव्यासाठी केवळ संविधान हाती घेऊन चालत नाही, तर संवैधानिक व्यवस्थाही पाळाव्या लागतात. संविधानाचे भान प्रत्येकाला असलेच पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे, असा टोलाही भाजपाने उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. BJP on Uddhav Thackeray |
उद्धव ठाकरेंवर राज ठाकरेंची टीका
राज ठाकरे म्हणाले की, “उद्धव ठाकरेंची आज निवडणूक आयोगाच्या लोकांनी बॅग तपासली. निवडणूक कर्मचाऱ्यांना कळत नाही. त्या बॅगमध्ये काय भेटणार. ज्यांच्या हातातून कधी पैसे निघाले नाहीत त्यांच्या हातातून आणखीन काय निघणार. फार तर रुमाल आणि कोमट पाणी.. अरे आमच्या पण बॅग तपासल्या आहेत. एवढा काय तमाशा करताय,” असा टोला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.
दरम्यान, यवतमाळ येथील सभेआधी सोमवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासल्या. त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी लातूरमधील औसा येथील सभेआधी देखील उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासण्यात आल्या आहेत. ज्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. BJP on Uddhav Thackeray |
हेही वाचा:
“डोळ्यावर गॉगल, कपाळावर मोठी टिकली अन्…”; मुक्ता बर्वेचे मालिकाविश्वात कमबॅक





