Somatane Phata Accident : सोमटणे फाट्यावर भीषण अपघात! कंटेनरच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
Somatane Phata Accident : तळेगाव दाभाडे परिसरात अपघातांचे सत्र सुरूच; सोमटणे फाट्यावर दुचाकीस्वाराचा भीषण अंत झाल्याने परिसरात शोककळा.
Updated On:

Somatane Phata Accident – सोमटणे फाटा येथे भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत एका ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. १ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जुना पुणे-मुंबई हायवेवर मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर घडली.बाबासाहेब रामभाऊ जाधव (वय ५३) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या प्रकरणात रोहित हनुमंत बजगुडे (वय २९, रा. शोभा नगर, तळेगाव दाभाडे) यांनी रविवारी (दि. १) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कंटेनर चालक लाल शेखर यादव (रा. ईसापूर, आजमगड, उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब जाधव हे आपल्या मोपेडवरून बाजारात जात होते.
यावेळी आरोपीने आपल्या ताब्यातील कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात जाधव हे वाहनाखाली आल्याने त्यांच्या पोटावरून चाक गेले आणि गंभीर दुखापत झाली. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तळेगाव दाभाडे पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.





